मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

ही मराठमोळी अभिनेत्री झळकणार मिताली राजच्या बायोपिकमध्ये

ही मराठमोळी अभिनेत्री झळकणार मिताली राजच्या बायोपिकमध्ये

भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा (Mithali Raj) बायोपिक 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेही (teeksha tawade )झळकणार आहे

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 10 नोव्हेंबर- सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकच्या ट्रेंडची चलती आहे. खासकरुन भारतीय खेळडूच्या बायोपिकना बॉलिवूडमध्ये विशेष महत्त्व दिलं जात आहे. यापूर्वी एम एस धोनी, सचिन तेंडुलकर, मिल्खा सिंह, मेरी कोम या भारतीय खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक रिलीज झाले आहेत. अशात आता भारतीय महिला वन डे आणि टेस्ट क्रिकेट संघांची कर्णधार मिताली राजचा (Mithali Raj) बायोपिक 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं पोस्टर नुकतंच समोर आलं आहे. या सिनेमात मराठमोळी अभिनेत्री तितीक्षा तावडेही (teeksha tawade )झळकणार आहे. तितीक्षाने काही फोटो शेअर करत ही बातमी शेअर केली आहे.

तितीक्षा तावडेने इन्स्टावर या सिनेमाच्या चित्रीकरणा दरम्यानचे फोटो शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. तितीक्षा तावडेची नेमकी भूमिका कोणाची आहे याबद्दल आद्याप माहिती मिळू शकलेली नाही. मात्र तिनं या सिनेमाच भाग असल्याचं या पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे.

भारतीय महिला क्रिकेट कर्णधार मिताली राजच्या बायोपिक ‘शाब्बास मिथू’ (Shabbas Mithu) चा फर्स्ट लुक नुकताच रिलीज झाला आहे. या सोबतच या सिनेमाची रिलीज डेटची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. या सिनेमात बॉलिवूडटची स्टार अभिनेत्री तापसी पन्नू (Tapasi Pannu)मितालीची व्यक्तिरेखा साकारत आहे. हा सिनेमा 5 फेब्रुवारी 2021 मध्ये रिलीज होणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन राहुल ढोलकिया करत आहे.

वाचा : प्रियांकासाठी खूपच खास आहे साखरपुड्याची अंगठी; त्यासाठी निकला विकावं लागलं होतं

मिताली राजनं 32 टी-20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. यात 2012, 2014 आणि 2016 तीन वर्ल्ड कपमध्ये कर्णधारी केली. 2006मध्ये महिला संघानं पहिला टी-20 सामना खेळला तेव्हा मिताली कर्णधार होती. मितालीनं 89 टी-20 सामने खेळले आहे. यात तिनं 2364 धावा केल्या आहेत, यात 17 अर्धशतकांचा समावेश आहे. 97 हा मितालीचा टी-20 क्रिकेटमधली सर्वोत्ताम खेळी ठरली आहे. मितालीनं 3 सप्टेंबर 2019 मध्ये टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.

वाचा : आलिया भट्टच्या डुप्लिकेटला पाहून चाहते झाले अवाक्! VIDEO पाहून म्हटलं 'ही तर...

तितिक्षा तावडेने कलर्स मराठी वरील सरस्वती तसेच झी मराठी वाहिनीवरील कन्यादान या मालिकांमध्ये काम केले आहे. तितिक्षा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

First published:

Tags: Bollywood, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment