Home /News /entertainment /

'जय मल्हार'ची म्हाळसा आता नव्या अवतारात; अभिनेत्री सुरभी हांडे 'या' मालिकेत दिसणार

'जय मल्हार'ची म्हाळसा आता नव्या अवतारात; अभिनेत्री सुरभी हांडे 'या' मालिकेत दिसणार

स्टार प्रवाह (StarPravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका २3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या मालिकेत मालिकेत अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi hande)दिसणार आहे.

  मुंबई, 30 ऑक्टोबर ; स्टार प्रवाह (StarPravah) वाहिनीवर अबोली (aboli) ही नवी मालिका २3 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. या मालिकेत अभिनेता सचित पाटील इन्सपेक्टरच्या भूमिकेत दिसणार आहे. आता या मालिकेतील आणखी एका कलाकाराचे नाव समोर आले आहे. या मालिकेत अभिनेत्री सुरभी हांडे (Surabhi hande)दिसणार आहे. कोणतं पात्र साकारणार आहे याविषयी माहिती समोर आलेली नाही. यापूर्वी 'जय मल्हार' मालिकेत सुरभीने साकारलेली म्हाळसाची भूमिका प्रेक्षकांना विशेष भावली होती. तसेच 'गाथा नवनाथांची' या मालिकेत देखील सुरभीने सप्तशृंगी देवीची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता सुरभी या नव्या मालिकेत दिसणार आहे. 'जय मल्हार' या पौराणिक मालिकेतून सुरभी म्हाळसा या भूमिकेमुळे घराघरात पोहचली होती. तिच्या या भूमिकेला रसिकांना भरभरून पसंती दिली होती.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  सिनेमांमध्ये रमलेले काही मराठी कलाकारांनी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये श्रेयस तळपदे, प्रार्थना, बेहेरे, मुक्ता बर्वे, उमेश कामत यांचा समावेश आहे. त्यांच्या पाठोपाठ आणखी सचित पाटील देखील छोट्या पडद्यावर मालिकेमधून पुनरागमन करत आहे. या मालिकेच्या कथानकवरून व यातील कलाकारांमुळे मालिकेमबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता लागली आहे. वाचा :लेकाला धक्क्यातून सावरण्यासाठी शाहरूख-गौरीची धडपड; आर्यन खानसाठी खास डाएट प्लॅन सचित पाटील त्याच्या या मालिकेबद्दल आणि त्यातील व्यक्तिरेखेबद्दल म्हणाला की, ' पुन्हा एकदा मालिकांमध्ये काम करायला मी खूपच उत्सुक आहे. स्टार प्रवाह सारख्या वाहिनी सोबत काम करायला मिळत आहे, त्याचा आनंद आहे. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी सगळ्या मालिका आवर्जून पहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय.या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. वाचा : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नॅशनल पार्कात; हटके पद्धतीने साजरी केली Diwali मालिकेतील दोन कलाकरांची नावे समोर आली आहेत. मात्र मालिकेत इतर कोणते कलाकार दिसणार याबद्दल देखील उत्सुकता आहे. तसेच सुरभीची भूमिका नेमकी काय आणि कशी असणार आहे याबद्दल काही माहिती समोर आली आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, TV serials

  पुढील बातम्या