मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /VIDEO: सुके बोंबील भाजतेय स्पृहा जोशी, आउटडोअर शूटच्या निमित्ताने सांगितलं 'तिघींचं' सिक्रेट

VIDEO: सुके बोंबील भाजतेय स्पृहा जोशी, आउटडोअर शूटच्या निमित्ताने सांगितलं 'तिघींचं' सिक्रेट

या VIDEO मध्ये स्पृहा (Spruha Joshi) गॅसवर सुके बोंबील भाजताना दिसते आहे. तिनेच हा व्हिडीओ Instagram वर शेअर केला आहे.

या VIDEO मध्ये स्पृहा (Spruha Joshi) गॅसवर सुके बोंबील भाजताना दिसते आहे. तिनेच हा व्हिडीओ Instagram वर शेअर केला आहे.

या VIDEO मध्ये स्पृहा (Spruha Joshi) गॅसवर सुके बोंबील भाजताना दिसते आहे. तिनेच हा व्हिडीओ Instagram वर शेअर केला आहे.

मुंबई, 29 मार्च: आपल्या आयुष्यातील छोट्या-छोट्या गोष्टींतून आनंद मिळविण्याची कला अनेक कलाकारांना अवगत असते. आपल्या चित्रिकरणाव्यतिरिक्त इतर गोष्टींतसुद्धा हे लोकं निपुण असतात. स्पृहा जोशीसुद्धा (Spruha Joshi latest video) अशीच एक मनस्वी अभिनेत्री. नुकताच स्पृहानं आपल्या Instagram अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात ती चक्क गॅसवर बोंबिल भाजताना दिसते आहे. त्याखाली लिहिलेल्या सविस्तर कॅप्शनमध्ये स्पृहाने एक सिक्रेटसुद्धा शेअर केलं आहे.

हा व्हिडीओ स्पृहाच्या चित्रिकरणाच्या सेटवरचा आहे. स्पृहा सध्या अलिबागमध्ये शूटिंग करत आहे. चित्रिकरणादरम्यान तिला थोडासा फावला वेळ मिळाला असावा. त्यात नेमका बोंबिल भाजायचाच सीन होता. मग काय शूटिंग संपल्यावर तिने सरळ आपला मोर्चा थेट सेटवरच्या स्वयंपाकघराकडे वळवला. तिथे स्वयंपाक करणाऱ्या ताईंना ती मदत करू लागली. शूटिंगसाठी आणलेले बोंबिल तिने भाजायला घेतले आणि सगळ्या सहकलाकारांबरोबर त्याचा फडशा पाडला.

View this post on Instagram

A post shared by Spruha Joshi (@spruhavarad)

याबद्दल लिहिताना स्पृहा म्हणते, 'अलिबागमध्ये आमचं चित्रिकरण सुरू आहे. यादरम्यान एका दृश्यासाठी बोंबील आणण्यात आले होते. आम्ही चित्रिकरणानंतर त्यांचा अक्षरशः फडशा पाडला.' आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा देत स्पृहा म्हणते, "माझ्या लहानपणी मी, आई, आणि क्षिप्रा दुपारी भूक लागली की असेच गॅस वर भाजून, तिखट, मीठ, लिंबू लावून बोंबील खायचो. आमच्या तिघींचं ते खास सिक्रेट होतं. आज कित्येक वर्षानी पुन्हा एकदा त्या सगळ्या आठवणी ताज्या झाल्या."

(हे वाचा:  रावरंभा: मराठी इतिहासातील आणखी एक योद्धा येणार मोठ्या पडद्यावर  )

स्पृहा मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. तिनं आपल्या खणखणीत अभिनयानं प्रेक्षकांना नेहमीचं भुरळ पाडली आहे. फक्त चित्रपटचं नव्हे, तर अनेक मालिका, नाटके यातसुद्धा तिनं अभिनय केला आहे. स्पृहा एक उत्तम कवयित्री सुद्धा आहे. ती सतत आपल्या कविता सोशल मीडियावर लिहून पोस्ट करत असते. आणि त्यांना चाहत्यांकडून भरभरून दाद सुद्धा मिळत असते. त्याचबरोबर स्पृहा ‘सूर नवा ध्यास नवा’ या गाण्याच्या कार्यक्रमात निवेदन करताना सुद्धा दिसून आली आहे.

स्पृहानं मोरया, पैसापैसा, मायबाप, सूर राहू दे,होम स्वीट होम,पेयिंग घोस्ट, विकी वेलिंगर या चित्रपटांत काम केलं आहे. तर अग्निहोत्र, एका लग्नाची दुसरी गोष्ट,उंच माझा झोका, प्रेम हे अशा गाजलेल्या मालिका सुद्धा केल्या आहेत.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment