मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

सिनेमाच्या शूटिंगसाठी ‘अप्सरा’ पोहोचली थेट लंडनमध्ये; म्हणतेय, थ्री चिअर्स टू अस !

सिनेमाच्या शूटिंगसाठी ‘अप्सरा’ पोहोचली थेट लंडनमध्ये; म्हणतेय, थ्री चिअर्स टू अस !

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni) सध्या लंडनमध्ये गेली आहे. फिरायला नाही तर तिच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हेमंत ढोमेही (Hemant Dhome) झळकणार आहे.

  • Published by:  Amruta Abhyankar

लंडन 27 नोव्हेंबर: लॉकडाऊनच्या काळात अनेक चित्रपटांची शूटिंग्ज रखडली होती. कलाकार, तंत्रज्ञ सगळेच हतबल होऊन घरी बसले होते. पण आता चित्रपट व्यवसायाला बरीच उभारी मिळाली आहे. मालिका, चित्रपटांचं शूटिंग दणक्यात सुरू झालं आहे. भारतातच नाही तर भारताबाहेरही भारतीय  सिनेमाच्या शूटिंगला पुन्हा एकदा परवानगी मिळायला लागली आहे. आता आपल्या मराठमोळ्या अप्सरेचंच उदाहरण घ्या ना. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonali Kulkarni)  सध्या लंडनमध्ये तिच्या नव्या सिनेमाच्या शूटिंगला गेली आहे. या चित्रपटामध्ये तिच्यासोबत हेमंत ढोमेही (Hemant Dhome) झळकणार आहे. ‘डेट भेट’ असं या चित्रपटाचं नाव आहे.

सोनाली कुलकर्णीने स्वत: याबाबत व्हिडीओ शेअर करत लिहीलं आहे, ‘थ्री चिअर्स टू अस.. माझा लंडनमधील तिसरा सिनेमा, मी आमि हेमंत ढोमे तिसऱ्यांदा सिनेमामध्ये एकत्र काम करत आहोत.. आणि लोकेश गुप्ते तिसऱ्या फिल्मचं दिग्दर्शन करत आहे.’

सोनालीने नुकतीच आणखी एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये सोनाली म्हणाली होती, ‘कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊननंतर मी पहिल्याच सिनेमाचं शूटिंग करत आहे. 2020 हे वर्ष संपण्याआधी मला ही फिल्म मिळाली आहे. लोकेश विजय गुप्तेच्या दिग्दर्शनाखाली आणि हेमंत ढोमेसोबत. पुन्हा एकदा नवी सुरूवात. शुभारंभ.’

कामाच्या बाबतीत बोलायचं झालं तर सोनालीने धुरळा या सिनेमामध्ये काम केलं होतं. या चित्रपटाची स्टारकास्ट तगडी होती. सई ताम्हणकर, अमेय वाघ, अलका कुबल असे अनेक दिग्गज कलाकार या चित्रपटात झळकले होते. गावातील राजकारण आणि त्याचा नातेसंबंधांवर होणार परिणाम या विषयावर हा सिनेमा आधारलेला होता. सोनाली तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर अतिशय सक्रीय असते. ती नेहमी तिच्या कामाबद्दल चाहत्यांना माहिती देत असते.

First published:

Tags: Marathi entertainment