S M L

आम्हाला बॉडीगार्ड असूनही भीती वाटते, सर्वसामान्यांचं काय? - सोनाली कुलकर्णी

आम्हा कलाकारांना तरी बॉडीगार्ड असतात पण तरीही मला भीती वाटते. तर बाकी सर्वसाधारण मुलींचं काय होत असेल असा प्रश्न सोनाली कुलकर्णी हिने उपस्थित केला आहे.

Renuka Dhaybar | Updated On: May 2, 2018 04:03 PM IST

आम्हाला बॉडीगार्ड असूनही भीती वाटते, सर्वसामान्यांचं काय? - सोनाली कुलकर्णी

02 मे : महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने चिंता व्यक्त केली आहे. आम्हा कलाकारांना तरी बॉडीगार्ड असतात पण तरीही मला भीती वाटते. तर बाकी सर्वसाधारण मुलींचं काय होत असेल असा प्रश्न सोनाली कुलकर्णी हिने उपस्थित केला आहे. पण तरीही सगळ्याच महिलांकडे बॉडीगार्ड नसतात हा खरा प्रश्न आहे.

दरम्यान दिवसेंदिवस मुलींवरील अत्याचाराच्या घटना पाहून मला खूप त्रास होतो असंही ती म्हणली आहे. नाशिकमध्ये आयोजित 97 व्या वसंत व्याख्यानमालेतील प्रकट मुलाखतीच्या कार्यक्रमादरम्यान ती बोलत होती.

महिला अत्याचारांवरील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण असं असतानाही त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र कायम ऐरणीवरच राहिला आहे. महिला अत्याचारांवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया उमटल्या. कास्टिंग काऊच सारख्या मोहिमेचा सहारा घेत अनेक महिलांनी आपल्यावरील अत्याचार सगळ्यांसमोर आणले. काहींनी त्याचं समर्थन केलं पण काहींनी मात्र हे चुकीचंच असं ठाम मत व्यक्त केलं.

पण या सगळ्यातून भारतात महिलांना खरंच सुरक्षित वाटणार आहे का? जर मोठमोठ्या नट्यांना बॉडीगार्ड असताना भिती वाटते तर सर्वसामान्य महिलांचं काय होणार ? यावर सगळ्यांनीच नुसता विचार नाही तर क्रिया करणं महत्त्वाचं आहे.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 2, 2018 04:00 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close