मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonalee : 'माझ्या सारख्या कलाकारांना...'; सोनालीनं मैत्रिणीकडे केली 'ही' मागणी, पोस्ट चर्चेत

Sonalee : 'माझ्या सारख्या कलाकारांना...'; सोनालीनं मैत्रिणीकडे केली 'ही' मागणी, पोस्ट चर्चेत

सोनाली कुलकर्णी फुलवा खामकर

सोनाली कुलकर्णी फुलवा खामकर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं मैत्रिणीसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. ज्यात मैत्रिणीचे आभार मानत तिनं एक महत्त्वाची मागणी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 03 ऑक्टोबर : महाराष्ट्राची लाडकी अप्सरा अर्थात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी. सोशल मीडियावर कायम सक्रीय असलेली सोनाली सध्या नवरात्री स्पेशल सीरिज तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर करत आहे. सोनाली तिच्या लग्नामुळे चांगलीच चर्चेत आली होती. कुणाल आणि सोनाली यांची वेडिंग स्टोरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाल्यानंतर दोघांच्या लग्नाची एकच चर्चा रंगली होती. वेडिंग स्टोरी प्रेक्षक पाहत असताना सोनालीनं तिच्या आयुष्यातील नवदुर्गांची नवी सीरिज सुरू केली आहे. आज अष्टमीच्या दिवशी सोनालीनं तिच्या खास मैत्रिणीसाठी पोस्ट लिहिली आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जास्त कोणाशी पटत नाही, असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. ज्या लोकांशी तिचं पटतं त्यांच्याबरोबर मात्र ती शेवटपर्यंत असते. अशीच तिची सिनेसृष्टीतील एक मैत्रीण म्हणजे नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर. या दोघींची मैत्री सर्वश्रृत आहे. सोनालीच्या प्रत्येक सिनेमात तिच्या गाण्याचं नृत्यदिग्दर्शन फुलवाचं करते. नवरात्री स्पेशल सीरिजमध्ये सोनालीनं फुलवाचे आभार मानलेत.

हेही वाचा - Sonalee Kulkarni: सिनेसृष्टीतील 'ही' अभिनेत्री आहे सोनालीची बेस्ट फ्रेंड; फोटो शेअर करत म्हणाली 'नवदुर्गा'

सोनालीनं लग्नाच्या ग्रहमख विधीचा फुलवाबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्याबरोबर सोनालीनं म्हटलंय, 'बुगी बुगी दिवसांपासून तिची चाहती असण्यापासून ते स सासूसाठी माझ्या पहिल्या अंगाई गाण्याच्या शूटसाठी तिला भेटण्यापर्यंत. ता. क. हेच ते तिने कोरिओग्राफ केलेलं माझं पहिलं गाणं आणि मग नटरंग झाला आमचे आयुष्य कायमचे बदलले, एकत्र!'

पुढे लिहीत सोनाली फुलवाकडून एका खास गोष्टीची मागणी केली आहे. तिनं म्हटलंय, 'तू खरोखर जादुई कलाकार आहेस. तुझ्याकडून मी खूप काही शिकते.  तुमच्यातला लहान मुलांसारखा प्रत्येक गोष्टीसाठी उत्साह मला माझ्यातही हवा आहे. माझ्यासारख्या कलाकारांना असेच प्रेरणा देत रहा आणि स्वतःमधली ती आग कायम जिवंत ठेव'.

मैत्रिणीचं प्रेम पाहून फुलवानं देखील तिच्या पोस्टवर रिप्लाय दिलाय. तिनं म्हटलंय, 'आपण भेटलो तेव्हापासून तू तशीच आहेस आणि हेच फार महत्त्वाचं आहे. ओळखीचा प्रसिद्धीचा आमच्या नात्यावर कधीच परिणाम झाला नाही. तू खूप प्रामाणिक आणि प्रेमळ आहेस म्हणूनच मी तुझ्यावर प्रेम करते'.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news