Home /News /entertainment /

VIDEO: सोनालीचं फिटनेसप्रेम! कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

VIDEO: सोनालीचं फिटनेसप्रेम! कॅप्शनने वेधलं सर्वांचं लक्ष

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अलीकडे आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत आहे.

  मुंबई, 5 जुलै- अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) नुकताच भारतात परतली आहे. मायदेशी परतताच तिने आपल्या रखडलेल्या प्रोजेक्ट्सच्या शुटींगला सुरुवात केली आहे. नुकताच सोनालीच्या जम्मू शूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांनतर आत्ता सोनालीने आपल्या जीमिंगचा एक व्हिडीओ चाहत्यांसाठी शेयर(Share Video) केला आहे. त्यामध्ये तिने दिलेल्या कॅप्शनने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
  मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अलीकडे आपल्या फिटनेसवर विशेष लक्ष देत आहे. सतत सोनालीच्या एक्सरसाईजचे विविध व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. यामध्ये सोनाली कधी पुशअप तर कधी स्कॉटसारख्या एक्सरसाईज करत असल्याचं दिसून येतं. नुकताच सोनालीने आपला एक एक्सरसाईज व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेयर केला आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं आहे, की ती खुपचं दिवसांनंतर आपल्या जिममध्ये गेली आहे. त्यामुळे ती खुपचं आनंदी आहे. तसेच तिच्या कॅप्शनमधील एका वाक्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोनाली म्हणते मी सध्या खुपचं बिझी आहे, मात्र मी माझं एक्सरसाईज अजिबात मिस नाही करत. सोनालीचं हे फिटनेसप्रेम पाहून अनेकांना प्रेरणा मिळत आहे. (हे वाचा: ‘लिटल चॅम्प’ फेम राशी पगारेची बहीण आहे प्रसिध्द अभिनेत्री; जाणून घ्या जोडीबद्दल ) सोनाली बऱ्याच दिवसानंतर भारतात परतली आहे. तिने काही महिन्यांपूर्वीच कुणाल बेनोडेकरशी लग्न केलं आहे. लग्नानंतर ती पतीसोबत दुबईमध्येचं होती. तसेच काही दिवसांपूर्वी ती पतीसोबत आफ्रिकामध्ये सुट्टीचा आंनद घेत होती. यासर्व विश्रांतीनंतर सोनाली भारतात परतली आहे. येताच तिने आपल्या कामाला सुरुवात केली आहे. नुकताच सोनालीने जम्मूमध्ये शूट केलं आहे. या शूटचे फोटो तिने सोशल मीडियावर शेयर केले होते. यामध्ये ती एका पंजाबी मुलीच्या वेशात दिसत होती. या प्रोजेक्टबद्दल कोणतीही स्पष्ट माहिती अजून जाहीर झालेली नाही. मात्र सोनालीला पंजाबी कुडीच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या