मराठमोळी अभिनेत्री सोनाली सध्या सोशल मीडियावर बरीच सक्रीय आहे. लॉकडाऊनमुळे बरेच दिवस शुटींग बंद असल्याने सर्व कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या होते. सोनाली कुलकर्णीसुद्धा आपल्या सोशल मीडियावरून सतत फोटो आणि व्हिडीओ शेयर करून चाहत्यांना आपल्या खास अपडेट होती. तसेच यादरम्यान ती आपल्या पतीसोबत दुबईमध्ये होती. आणि तेथे राहून ती आपल्या फिटनेसवर लक्ष देत होती. आत्ता ती मायदेशी परतली आहे. परत येताच तिने शुटींगलादेखील सुरुवात केली आहे. मात्र यासर्व व्यापात तिने आपलं वर्कआउट अजिबात मिस होऊ दिलं नाहीय. वर्कआउटच्या वेळ ती कटाक्षाने पाळत आहे. (हे वाचा: 'आई कुठे काय करते' मालिकेत मोठा ट्विस्ट; अरुंधती पुन्हा सोडणार आपलं घर!) नुकताच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती जिममध्ये असल्याचं दिसत आहे. शिवाय ती एका खांबाला लटकून अगदी हार्ड वर्कआउट करताना दिसत आहे. हा ABS वर्कआउट आहे. सोनालीचा हा खटाटोप एब्ससाठी चालला आहे. सोनालीची ही मेहनतपाहून भल्या भल्यांना घाम फुटत आहे. तसेच सोशल मीडियावर सध्या तिच्या फिटनेसची जोरदार चर्चा आणि सोबतचं कौतुकदेखील होतं आहे. (हे वाचा:अभिज्ञा-अंकिताची धम्माल; पाहा 'पवित्र रिश्ता 2' च्या सेटवरील VIRAL व्हिडीओ ) काही दिवसांपूर्वीचं सोनालीने एक पोस्ट शेयर करत, आपण 3 महिन्यांत 5 किलो वजन कमी केल्याचं सांगितलं होतं. आणि आनंदही व्यक्त केला होता. सोनालीमध्ये आत्ता बराच बदलही दिसून येत आहे. ती खरोखरचं आधीपेक्षा अधिक फिट आणि सुंदर दिसत आहे. तिचे हे व्हिडीओ अनेकांसाठी इंस्पीरेशन ठरत आहेत. तसेच या व्हिडीओमुळे अनेक फिटनेससाठी धडपडनाऱ्या तिच्या चाहत्यांमध्ये आत्मविश्वास येत आहे.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.