मुंबई, 9 जून- मराठी चित्रपटसृष्टीतील अप्सरा म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी(Sonalee Kulkarni) नुकताच लग्नबंधनात अडकली आहे. सध्या ती आपल्या पतीसोबत दुबईमध्ये आहे. हावेळ सोनाली फक्त एन्जॉयच करत नाहीय तर आपल्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देत आहे. मि. आणि मिसेस बेनोडेकर सध्या फिटनेससाठी जोरदार कष्ट घेत आहेत. सोनाली आणि कुणालचा एक व्हिडीओ व्हायरल(Viral Video) होतं आहे. त्यामध्ये ते दोघेही एक्सरसाईज करताना दिसत आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सध्या फिटनेसवर थोडं जास्तचं लक्ष देताना दिसत आहे. आणि त्यामध्ये त्याला कंपनी देत आहे, त्याचा पती कुणाल बेनोडेकर. सोनालीने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती आपला पती कुणालसोबत एक्सरसाईज करताना दिसत आहे. हे दोघेही एकमेकांच्या साथीने ही वेळ एन्जॉय करत आहेत. हे दोघेही फक्त फिटनेसचं नव्हे तर कपल गोल देखील देत आहेत.
(हे वाचा:Breakup नंतर पहिल्यांदाच व्यक्त झाली 'पवित्र रिश्ता' फेम आशा नेगी, म्हणाली... )
सोनालीने गेल्यावर्षी लॉकडाऊनमध्ये आपला साखरपुडा झाल्याचं जाहीर केल होतं. तेव्हापासूनच ती लग्न कधी करणार याची सर्वांना उत्सुकता लागली होती. तर यंदा ती कुणालला भेटायला दुबईला गेली होती. आणि नेमका लॉकडाऊन करण्यात आला. आणि त्यामुळे ती दुबईतचं अडकली होती. याचदरम्यान कुणाल आणि सोनालीने कुटुंबाच्या संमतीने आपलं लग्नसुद्धा उरकून घेतलं. आणि आत्ता ही सुंदर जोडी आपला नवा संसार आनंदाने फुलवत आहे.
(हे वाचा: HBD: मराठी, हिंदीनंतर आता साऊथच्या पडद्यावरही झळकली पल्लवी )
सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केल आहे. तो कामानिमित्त दुबईमध्ये राहतो. सध्या सोनाली आणि तो दुबईमध्ये आहेत. यावेळी ते आपलं नवं नातं एन्जॉय करत आपल्या फिटनेसकडे सुद्धा लक्ष देत आहेत. सध्या सोनाली आणि कुणालचा हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.