लॉकडाऊनमुळे प्रत्येक कलाकाराकडे स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता. त्यामुळे अनेक कलाकारांनी आणि खासकरून अभिनेत्रींनी योगा आणि इतर व्यायामावर विशेष लक्ष दिलं आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी दररोज सोशल मीडियावर आपल्या व्यायामाचे व्हिडीओ शेयर करत असते. काही दिवसांपूर्वी सोनालीने आपल्या पतीसोबत एक सुंदर व्हिडीओ शेयर केला होता. त्यामध्ये हे दोघेही व्यायामाचे प्रकार करताना दिसून आले होते. (हे वाचा: VIDEO: लवकरच येतोय 'समांतर 2' चा ट्रेलर; पाहा स्वप्नील जोशीची खास पोस्ट ) त्यानंतर आत्ता सोनालीने एक नवा व्हिडीओ शेयर केला आहे. त्यामध्ये ती चक्क पुशअप्स मारताना दिसत आहे. खरतर सोशल मीडियावर सध्या पुशअप्स चॅलेंज सुरुय. प्रत्येक लोक एकमेकांना हा चॅलेंज देत आहेत. सोनालीने सुद्धा हे चॅलेंज एक्सेप्ट करत पुशअप्स मारले आहेत. सोनालीचा हा दमदार व्हिडीओ चाहत्यांना खुपचं आवडला आहे. सोनाली सध्या आधीपेक्षासुद्धा खुपचं फिट दिसून येत आहे. (हे वाचा:शर्वरीच्या हातांवर प्रेमाचा रंग...; लवकरच होणार 'शुभमंगल ऑनलाईन' ) काही दिवसांपूर्वीचं सोनालीने कुणाल बेनोडेकरसोबत लग्न केलं आहे. आणि सध्या ती कुणालसोबत दुबईमध्ये राहात आहे. लॉकडाऊनमुळे या दोघांनाही अगदी गडबडीत आपलं लग्न उरकाव लागलं होतं. ते सध्या एकमेकांसोबत कॉलिटी टाईम स्पेंड करत आहेत. सोनाली सोशल मीडियावर सुद्धा बरीच सक्रीय आहे. ती सतत आपले अपडेट चाहत्यांना कळवत असते. या व्हिडीओवर चाहतेसुद्धा भरभरून प्रेम करत आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sonalee Kulkarni