'सई'चं ताईबरोबरचं गाणं VIRAL: 'ही वाट दूर जाते' वर देशपांडे भगिनींचा कसा सूर लागला पाहा VIDEO

'सई'चं ताईबरोबरचं गाणं VIRAL: 'ही वाट दूर जाते' वर देशपांडे भगिनींचा कसा सूर लागला पाहा VIDEO

'माझा होशील ना' मालिकेतली सई अर्थात गौतमी देशपांडे छान गाते, हे एव्हाना तिच्या फॅन्सना माहिती झालंच असेल. पण बहीण मृण्मयीबरोबर गाताना ती कशी खुलते हे या VIDEO तून दिसेल.

  • Share this:

मुंबई, 5 मार्च: झी मराठीवर सध्या लोकप्रिय असलेल्या माझा होशील ना (Maza hoshil na marathi serial) मालिकेतली सई अर्थात गौतमी देशपांडे (Gautami deshpande) चांगली गाते, हे एव्हाना तिच्या फॅन्सना माहिती झालं असेलच. सध्या सोशल मीडियावर  या 'सई'चा एक व्हिडीओ खूप लोकांनी लाइक केला आहे. मृण्मयी देशपांडे (Mrunmayee Deshpande)आणि गौतमी देशपांडे या बहिणींनी 'ही वाट दूर जाते'  गाण्याची सुंदर लय पकडल्याचा हा VIDEO आहे.

मराठी चित्रपटसृष्टीत अशा खूप कमी भावंडांच्या जोड्या आहेत ज्यांच्या पदरी यश पडलंय. त्यातीलच एका बहिणींची जोडी म्हणजे मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे. या दोघी बहिणींनी मराठी अभिनय क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या दोघी बहिणी दिसायलासुद्धा बऱ्याचशा एकसारख्याच आहेत. दोघीही तितक्याच सुंदर आणि कलागुणसंपन्न आहेत. या दोघींमध्ये खूप चांगलं मैत्रीपूर्ण नातं देखील आहे.  ते त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून दिसत असतं. त्यामुळे सतत त्या सोशल मीडियावर एकमेकांसोबत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात.

नुकताच सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यामध्ये या दोघी बहिणी आपल्या गोड आवात एक सुंदर मराठी गाणं म्हणत आहेत.

'खूप दिवसांनी सोबत गायनासाठी वेळ मिळाला. एकमेकांसोबत गाणं म्हणणं एक मज्जा आहे, आनंद आहे. आशा करते तुम्हालाही आवडेल.' असा आशयाचा मजकूरही गौतमीनं व्हिडीओ खाली लिहिला आहे.आणि हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस येत आहे. दोघी बहिणींना गायनाची खूपचं आवड आहे. म्हणूनच अनेक वेळा त्यांच्या गाण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर याआधीही दिसले आहेत. लॉकडाऊनमध्ये सुद्धा बऱ्याचवेळा यांना गाताना पाहायला मिळालं होतं.

(हे पाहा: मालिकेचा शतकपूर्ती सोहळा असा रंगला; सुबोध-ऋजुताचा सेलिब्रेशन व्हिडीओ झाला VIRAL   )

मृण्मयी ही मोठी असून गौतमी लहान आहे. गौतमी इंजिनीअर आहे. तिने काही काळ नोकरीही केली होती. पण आता दोघीही अभिनय क्षेत्रात चांगल्याच सक्रिय आहेत. मृण्मयीने 'मोकळा श्वास', संशय कल्लोळ', 'कट्यार काळजात घुसली', 'नटसम्राट', 'फर्जंद', 'फत्तेशिखस्त' या व अशा अनेक प्रसिद्ध चित्रपटांत काम केलं आहे. त्याचबरोबर 'कुंकू', 'अग्निहोत्र' अशा मालिकाही केल्या आहेत. तसचं निवेदन सुद्धा केलं आहे. तर दुसरीकडे गौतमीनं 2018 मध्ये अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिनं 'सारे काही तुझ्यासाठी'ही मालिका केली आहे. तर सध्या 'माझा होशील ना' ही झी टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका करत आहे. मृण्मयीचं मुंबईच्या एका व्यावसायकाशी लग्न झालं आहे. तर गौतमी अजून सिंगल आहे.

Published by: Aiman Desai
First published: March 5, 2021, 7:50 AM IST

ताज्या बातम्या