मुंबई, 22 जानेवारी- मनोरंजन सृष्टीतून एक दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध रंगकर्मी आणि ज्येष्ठ गायिका कीर्ती शिलेदार (Kirti Shiledar) यांचं आज आकस्मिक निधन झालं आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कीर्ती शिलेदार या 70 वर्षांच्या होत्या. त्यांनी गेली 60 वर्षे रंगभूमीला दिली आहेत. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.
आज सकाळची प्रकृती खालावल्यानं त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. त्या 70 वर्षांच्या होत्या. परंतु त्यांनी तब्बल 60 वर्षे रंगभूमीवर आपली कला सादर केली आहे. त्यांनी वयाच्या 10 व्या वर्षी या क्षेत्रात पदार्पण केलं होतं. त्यांनी आपल्या अभिनयाने सर्वानांच आपलस केलं होतं. अभिनयच नव्हे तर त्यांनी आपल्या आवाजाची जादूसुद्धा सर्वांवर पसरवली होती. त्या अभिनेत्रीसोबतच एक उत्कृष्ट गायिका होत्या. मराठी रंगभूमीवर आपल्या अभिनय आणि गायनाच्या जोरावर आपली खास ओळख निर्माण केली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने मनोरंजन सृष्टीवर शोककळा पसरली आहे.
Published by:Aiman Desai
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.