Home /News /entertainment /

अजय पुरकर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्री सोडली 'मुलगी झाली हो' मालिका, वाचा डिटेल्स

अजय पुरकर यांच्यानंतर आणखी एका अभिनेत्री सोडली 'मुलगी झाली हो' मालिका, वाचा डिटेल्स

किरण माने (Kiran Mane) प्रकरणामुळे 'मुलगी झाली हो' (Mulgi Zali Ho) ही मालिका प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मालिका सतत चर्चेत असते.

  मुंबई, 16 एप्रिल-   किरण माने   (Kiran Mane)  प्रकरणामुळे 'मुलगी झाली हो'   (Mulgi Zali Ho)  ही मालिका प्रचंड चर्चेत आली होती. त्यांनतर कोणत्या ना कोणत्या कारणाने ही मालिका सतत चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ही मालिका बंद होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यांनतर अभिनेते अजय पुरकर  (Ajay Purkar)  यांनी मालिका सोडत असल्याचं सांगत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यांनतर आता आणखी एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याची माहिती समोर आली आहे. पाहूया कोण आहे ती अभिनेत्री. मागच्या काही दिवसांपासून मुलगी झाली हो मालिका किरण माने प्रकरण असेल किंवा मध्येच मालिका बंद होणार असल्याच्या कारणानरून चर्चेत आहे. मात्र वाहिनीने यावर स्पष्टीकरण देत मालिका बंद होणार नसून मालिकेची वेळ दुपारी 2 वाजता केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याचा विषय आता शिथिल झाला आहे. हा विषय शांत होतो न होतो तोपर्यंत अभिनेते अजय पुरकर मालिका सोडत असल्याचं समोर आलं होतं. अजय पूरकर यांनी दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित पावनखिंड (Pawankhind Movie) चित्रपटामध्ये बाजीप्रभुंची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. सध्या त्यांचा शेर शिवराज हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे ते सिनेमाच्या प्रमोशनात व्यस्थ आहेत. प्रेक्षक पुन्हा त्यांना मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी उत्सुक आहेत.
  त्यांनतर आता पुन्हा एकदा नवी माहिती समोर आली आहे. अजय पुरकर यांच्या नंतर आणखी एका अभिनेत्रीने मालिका सोडल्याचं समोर आलं आहे. मनोरंजन मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर ही बातमी शेअर करण्यात आली आहे. या मालिकेतील आर्याची भूमिका साकारलेली अभिनेत्री श्वेता आंबिकरने ही मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे. परंतु श्वेताने ही मालिका का सोडली याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाहीय. एकापाठोपाठ एक कलाकार मालिका सोडत असल्याने पुन्हा सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
  Published by:Aiman Desai
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Tv serial

  पुढील बातम्या