Home /News /entertainment /

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचे फेसबुक अकाऊंट हॅक; 'ती' लिंक ओपन न करण्याचे आवाहन

अभिनेत्री शुभांगी गोखलेंचे फेसबुक अकाऊंट हॅक; 'ती' लिंक ओपन न करण्याचे आवाहन

मराठमोळ्या अभिनेत्री शुभांगी गोखले ( shubhangi gokhale facebook account hacked ) यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यासंदर्भात शुभांगी गोखलेंनी स्वत: माहिती दिली आहे.

    मुंबई, 28 नोव्हेंबर - सोशल मीडियावरून फसवाफसवीच्या केस वाढल्या आहेत. अनेकवेळा नावाचा गैरवापर करून फसवणूक केली जाते तसेच चुकीचे मेसेज पाठवले जातात तसेच अकाउंट हॅक केले जातात . आता मराठमोळ्या अभिनेत्री शुभांगी गोखलेंनाही ( shubhangi gokhale facebook account hacked )अशा प्रकारच्या हॅकिंगचा अनुभव आला आहे. शुभांगी यांचं फेसबुक अकाउंट हॅक झालं आहे. त्यासंदर्भात शुभांगी गोखलेंनी स्वत: माहिती दिली आहे. शुभांगी गोखलेंनी सोशल मीडियावर लिहिले आहे,पुन्हा एकदा माझे अकाऊंट हॅक झाले आहे. माझ्या नकळत सर्वांना मेसेजमध्ये एक लिंक जात आहे. कृपया ती लिंक ओपन करू नका. माझे सायबर सेलसोबत बोलणं सुरू आहे. शुभांगी गोखले यांनी फेसबुक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की,त्यांच्या अकाउंटवरुन पाठवलेल्या लिंक वर क्लिक केल्यास अश्लील फोटो उघडले जात असल्याचं या पोस्टमध्ये म्हटलं आहे. ‘हा मेसेज गेले अनेक दिवस फेसबुक मेसेंजर वर फिरतोय. कृपया कुणी तुम्हाला ही लिंक पाठवली तर ओपन करू नका. ओपन केलीत तर तुमच्या प्रोफाईलवरून इतरांना मेसेज जातील. वाचा :जाह्नवी कपूरचे मेकअप आर्टिस्टसोबत जोराचे भांडण; अर्जुन कपूरची अशी होती प्रतिक्रिया ही एक व्हायरस लिंक आहे. तुम्ही जर क्लिक केलं तर ही लिंक तुम्हाला फेक युट्युब सारख्या दिसणाऱ्या साईटवर घेऊन जाते. जिथे मेसेंजर सारखंच पेज दिसतं, तिथे लॉग इन केल्याशिवाय व्हिडिओ दिसणार नाही असं सांगितलं जातं…हा ट्रॅप आहे यात अडकू नका’ ही पोस्ट शेअर करत त्यांनी चाहत्यांना सावध राहण्याचं आवाहन केलं आहे.दरम्यान, अभिनेत्री शुभांगी गोखले यांनी या प्रकरणी सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली असून सायरब सेलने तपास सुरु केला आहे. छोट्या पडद्यावरील 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. अशातच या मालिकेतील सर्वांची लाडकी शकू मावशी अर्थात शुभांगी गोखले यांनी मालिका सोडली. आता मालिकेत शुभांगी गोखलेंच्या जागी किशोरी अंबीये शकू मावशीच्या भूमिकेत दिसत आहेत. वाचा :आलिया भट्टने 'RRR' मध्ये 15 मिनिटांचा रोल करण्यासाठी घेतले इतके कोटी सोशल मिडियावर सध्या हनी ट्रॅप लिंकची चर्चा जोरदार आहे. लिंक पाठवून पैसे उकळण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. आता असाच अनुभव शुभांगी गोखले यांना देखील आला आहे. त्यांनी वेळेत सावध होऊन चाहत्यांना देखील सतर्क केले आहे. यापूर्वी भरत जाधव यांच्या देखील नावाचा चुकीचा वापर करून असाच काहीसा गैरप्रकार सुरू होता. त्यावर भरत जाधव यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करत सर्वांना सतर्क केले होते.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    पुढील बातम्या