मुंबई, 29 मार्च- 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. श्रेया बुगडेनं मराठी मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय अभिनेत्यासाठी पोस्ट केली आहे. सध्या तिची पोस्ट सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. नेमरकी ही पोस्ट कशाबद्दल आहे , असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबद्दलच आपण जाणून घेणार आहे.
श्रेया बुगडेनं या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, तू नेहमीच माझ्या हृदयाच्या जवळ आहेस आणि तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला काहीच अर्थ नाही. जर प्रत्येक बहिणीला तुमच्यासारखा भाऊ असेल तर जग आणखी चांगलं होईल. मोठ्या भावाबरोबर आयुष्य नेहमीच छान असतं. तू माझा खूप चांगला मित्र आहेस. तुझा वाढदिवस साजरा करताना मी तिथे आहे याचा मला खूप आनंद आहे दादू. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी देखील कमेंट करत अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
वाचा-समंथा प्रभूसोबत घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्य करणार दुसरं लग्न
श्रेया बुगडे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा चाहता वर्ग देखील खूप मोठा आहे. याशिवाय तिचा मित्र परिवार देखील मोठा आहे. अनेकदा ती मराठी मनोरंजन विश्वातील तिच्या मित्र परिवारासोबत डिनर असेल किंवा पार्टी करताना दिसते. मराठी अभिनेता पियुष रानडे याला श्रेया बुगडे भाऊ मानते. ही बहीण भावाची जोडी दरवर्षी भाऊबीज, रक्षाबंधनही एकत्र साजरं करतात. आज त्याचा वाढदिवस आहे. यानिमित्त श्रेयानं लाडक्या भावासाठी एक खास पोस्ट लिहिली आहे. आपल्या लाडक्या भावासोबतचे फोटो देखील तिनं शेअर केले आहेत.
View this post on Instagram
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. श्रेया अनेकवेळा पती आणि कुटुंबासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. श्रेयाच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि मोठी बहीण देखील आहे.
श्रेया बुगडे तिच्या ड्रेसिंग स्टाईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या बॅग आणि ग्लासेस कलेक्शनसाठी ओळखली जाते. प्रत्येक ड्रेसवर ती वेगळी बॅग सोबत त्याला मॅच होणाऱ्या ग्लासेस नेहमीच सर्वांचे लक्षवेधून घेत असतात. एका मुलाखतीत तिनं तिच्या या आवडीबद्दल देखील सांगितलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.