मुंबई, 3एप्रिल- 'चला हवा येऊ द्या' फेम श्रेया बुगडे (Shreya Bugade)सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. सध्या श्रेया बुगडे किचन कल्लाकार हा शो देखील होस्ट करताना दिसते.श्रेया बुगडेने नुकतीच एक पोस्ट केली आहे. आम्रखंड की.... श्रीखंड?...असा प्रश्न तिनं विचाराताच चाहत्यांनी देखील त्याला नादखुळा कमेंट करत(Shreya Bugade latest post) उत्तर दिलं आहे.
श्रेया बुगडेने पिवळ्या रंगाच्या साडीतील तिचे सुंदर फोटो इन्स्टाला शेअर केले आहेत सोबत तिनं भन्नाट कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, आम्रखंड की..... श्रीखंड ?????...आज दुपारी बेत काय होता ते विचारतेय ??? तिच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंटचा सपाटाच लावला आहे. एकानं म्हटलं आहे की, आमच्याकडं कचा बदाम तर दुसऱ्याने म्हटलं आहे की,बुंदेलखंड तर एकानं म्हटलं आहे की, नर्सोबाच्या वाडीची बासुंदी...तर काहींनी गुलाबजाम तर काहींनी रबडी अशा कमेंट केल्या आहेत. तर एकानं म्हटलं आहे, मटण. सध्या या कमेंटची मात्र चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
श्रेया बुगडे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीत काम करत आहे. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळाली. श्रेया मुळची पुण्याची आहे. बालपणापासूनच हुषार असलेली श्रेया कमी वयातच या इंडस्ट्रीत आली. बालनाट्यातून कमी वयातच तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली. श्रेया अनेकवेळा पती आणि कुटुंबासोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत असते. श्रेयाच्या कुटुंबात तिचे आई-वडील आणि मोठी बहीण देखील आहे.
Published by:News18 Trending Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.