Home /News /entertainment /

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील, पाहा VIDEO!

अभिनेत्री सायली संजीवने ट्रेंडिग गाण्यावर शेअर केलं रील, पाहा VIDEO!

अभिनेत्री सायली संजीवनं इन्स्टाग्रावर(sayali sanjeev instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. सायलीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय.

  मुंबई, 3 जुलै :  मराठमोळी अभिनेत्री सायली संजीव (Sayali sanjeev) सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. अशातच सायली संजीव एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. सायलीनं इन्स्टाग्रावर(sayali sanjeev instagram) एक व्हिडीओ शेअर केला आहे. सायलीनं शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतोय. सायलीनं इन्स्टाग्रामवर एक रील शेअर केलं आहे. यामध्ये सायली, अभिनेता आशय कुलकर्णी (ashay kulkarni)आणि अभिनेता नीतीश चव्हाण(Nitish chavhan) डान्स करताना दिसत आहे. सोशल मीडियावर ट्रेंडिंग असणाऱ्या गाण्यावर हे तिघेही डान्स करताना दिसत आहे. कारण हे ट्रेंडिंग आहे असं म्हणत सायलीनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिच्या या व्हिडीओवर अनेक कमेंट येत आहेत. अनेकांनी तिच्या या व्हिडीओला पसंती दर्शवली आहे. हेही वाचा - Samantha Ruth Prabhu: 'अनेक अपयशी लग्नांचं कारण फक्त तूच!' 'पुष्पा' फेम अभिनेत्रीचा करण जोहरवर थेट आरोप! सायली संजीवने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्या हटके भूमिका आणि अभिनय कौशल्यानं तिनं नेहमीच चाहत्यांचं मन जिंकलं आहे. सायली संजीवला झी मराठीवरील 'काहे दिया परदेस' या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली, तिची 'गौरी' ही व्यक्तिरेखा लोकांना खूप आवडली. दरम्यान सायलीचा आगामी चित्रपट (sayali sanjeev upcoming movie)लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सुबोध भावे दिग्दर्शित 'मारवा' चित्रपटात सुबेध भावेसह (Subodh bhave) सायली संजीव मुख्य भूमिकेत दिसणार आहे.सायलीचा नवा सिनेमा पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांनी उत्सुकता दाखवली आहे. मारवा या सिनेमाची कथा वैभव जोशी यांनी लिहिली आहे तर नितीन प्रकाश वैद्य यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे.
  सायली संजीवने नाशिकच्या एचपीटी आर्ट्स आणि आरवायके सायन्स कॉलेजमधून बीए पॉलिटिक्सची पदवी घेतली आहे. तिला कॉलेजचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. त्यानंतर त्याने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिने स्वारोवस्की जेम्स, डेंटझ, क्विकर आणि बिर्ला आयकेअरसाठी मॉडेलिंग देखील केले आहे.
  Published by:Sayali Zarad
  First published:

  Tags: Entertainment, Instagram, Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Sayali Sanjeev

  पुढील बातम्या