Home /News /entertainment /

स्वामिनी फेम सानिका बनारसवाले अडकली विवाहबंधनात, Video शेअर करत दिली माहिती

स्वामिनी फेम सानिका बनारसवाले अडकली विवाहबंधनात, Video शेअर करत दिली माहिती

स्वाभिमान, स्वामिनी या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री सानिका बनारसवाले लग्नबंधनात अडकली आहे. सानिकाने ऋषभ कठारिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे.

  मुंबई, 23 डिसेंबर - स्वाभिमान, स्वामिनी या मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री सानिका बनारसवाले लग्नबंधनात अडकली आहे. सानिकाने ऋषभ कठारिया याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. तिनं सोशल मीडियावर लग्नाचा व्हिडिओ शेअर केला आहे. चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सानिकाने स्वमिमान ही मालिका देखील काही दिवसापूर्वी सोडली होती. त्यावेळेस तिनं लग्नासाठी ही मालिका सोडल्याची चर्चा होती. यासोबतच तिनं स्वामिनी मालिकेत साकारलेली जानकीबाई यांची भूमिका प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहे. या मालिकेमुळे ती महाराष्ट्राच्या घऱघारत पोहचली.
  बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात देखील लग्नाचा सीजन आहे. नुकतच दिव्या पुगाकवर हिचा साखरपुडा झाला आहे. तर ती लवकरच लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे. यासोबत श्वेता अंबिकर या अभिनेत्रीने देखील नुकतीच लग्नगाठ बांधली आहे. त्यामुळे मराठी मनोरंजन विश्वात सध्या लग्नाचे वारे जोरात वाहत आहे. वाचा-सलमान खानचा अ‍ॅक्शन थ्रिलर 'अंतिम' OTT वर होणार रिलीज! सानिका सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.ती तिचे विविध फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.  सानिकाने काही दिवसापूर्वी पती ऋषभ कठारिया याच्यासोबत काही फोटो शेअर केले आहेत. आता तिनं लग्नाचा एक व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केला. या जोडींवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Colors marathi, Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या