Home /News /entertainment /

सई ताम्हणकरला या अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न ; यापूर्वी केलंय त्याच्यासोबत काम

सई ताम्हणकरला या अभिनेत्यासोबत करायचं होतं लग्न ; यापूर्वी केलंय त्याच्यासोबत काम

सई ताम्हणकरने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलचे एक सिक्रेट सांगितलं आहे. तिला एका अभिनेत्यासोबत लग्न करायचे होते व त्यासोबत तिनं एक सिनेमा देखील केला असल्याचे तिनं यावेळी सांगितले.

    मुंबई, 15 मार्च- अभिनेत्री सई ताम्हणकरचे ( Sai Tamhankar ) नाव मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत घेतले जाते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळु तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला. मराठीसोबतच सईने हिंदीत देखील ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. सईने नुकत्याच pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दलचे एक सिक्रेट सांगितलं आहे. तिला लहानपाणासूनच एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत लग्न  करायचे होतं असं तिनं सांगितलं आहे. सई ताम्हणकरनं pinkvilla ला दिलेल्या मुलाखतीत तिच्या आजपर्यंत मराठी तसेच हिंदी सिनेमातील अभिनय प्रवासाचा उलगडा केला. यावेळी तिनं हंटर सिनेमात तिनं साकारलेल्या भूमिकेनंतर तिल्या तशाच प्रकारच्या भूमिकांबद्दल ऑफर येत असल्याचे सांगितले. त्यानंतर तिनं लव्ह- सोनिया सिनेमा तीन वर्षांनी स्वीकारला असल्याचे सांगितले. कारण ती वेगळ्या भूमिकेच्या प्रतीक्षा करत असल्याचे देखील तिनं सांगितलं. शिवाय बिकीन घातल्यानंतर मराठी मनोरंजन विश्वात कशाप्राकारे तिला रिअॅक्शन मिळाल्या या आणि अशा अनेक गोष्टींचा खुलासा केला. वाचा-'माझ्या आयुष्यात तू....', जुईलीच्या बर्डडेला रोहित राऊतची हृदयस्पर्शी पोस्ट यावेळी सईला म्हणते, मी आमिर खानची ( aamir khan ) खूप मोठी फॅन होती. मी आईला लहानपणीच सांगितले होते की, मी जेव्हा मोठी होईल तेव्हा याच्याशी लग्न करेल. तिनं गजनी सिनेमात आमिर खानसोबत काम केले आहे. या सिनेमात काम करण्यासंदर्भात तिला जेव्हा  फोन आला तेव्हा लगेच होकार कळवल्याचे देखील तिनं सांगितलं.
    तसेच ती पुढं म्हणाली की, मला हिंदीतील कोंकणा सेन, आलिया भट्ट, सीमा पावा, तिलोतमा, राधिका आपटे या बॉलिवूड कलाकरांसोबत काम करायला आवडेल असं देखील सांगितले. शिवाय क्रिती सेनॉन, पंकज त्रिपाटी यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव देखील उत्तम असल्याचे तिनं यावेळीसांगितलं.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Aamir khan, Bollywood News, Entertainment, Marathi entertainment, Sai tamhankar

    पुढील बातम्या