मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

नांदा सौख्य भरे ! सई लोकूर अडकली विवाहबंधनात

नांदा सौख्य भरे ! सई लोकूर अडकली विवाहबंधनात

अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) विवाहबंधनात अडकली आहे. जवळचे नातेवाईक आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत तिचा लग्नसोहळा पार पडला.

  • Published by:  Amruta Abhyankar

मुंबई, 30 नोव्हेंबर: बिग बॉस मराठी (Bigg Boss Marathi) फेम अभिनेत्री सई लोकूर (Sai Lokur) विवाहबंधनात अडकली आहे. तीर्थदीप रॉयसह तिने लग्नगाठ बांधली आहे. जवळचे मित्रमंडळी आणि कुटंबीय यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला. सईने मराठी आणि बंगाली दोन्ही पद्धतीने लग्न केलं आहे. वधूच्या वेशात सई अतिशय सुंदर दिसत होती.

सईच्या लग्नाचे फोटो लीक झाले आहेत. तिचे फोटो बघून तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. 2020 या वर्षात अनेक कलाकार लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. काही दिवसांपूर्वीच सईने तिच्या साखरपुड्याची बातमी दिली होती. तीर्थदीप रॉयदेखील सिनेनिर्माता आहे. तसंच तिच्या ग्रहमकाचे फोटोही सोशल मीडियावरुन शेअर केले होते.

View this post on Instagram

A post shared by Sai Lokur (@sai.lokur)

सई लोकूरने ‘मिशन चॅम्पियन’ या चित्रपटामधून तिच्या अभिनयातील कारकिर्दीला सुरुवात केली होती. हा चित्रपट तिच्याच आईने अर्थात वीणा लोकूर यांनी यांनी दिग्दर्शित केला होता. किस किस कों प्यार करू या हिंदी चित्रपटामध्येही सई झळकली होती. यात तिने कपील शर्मासोबत काम केलं होतं. सई लोकुरला खरी ओळख दिली ती बिग बॉस मराठीच्या पर्वाने (Bigg Boss Marathi). या खेळात ती अंतिम टप्प्यात पोहोचली होती. बिग बॉसच्या सेटवर सई आणि पुष्करची मैत्रीही फारच लोकप्रिय झाली होती. सई सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते.

First published:

Tags: Marathi entertainment