मुंबई, 1 एप्रिल- मराठमोळी अभिनेत्री ऋतुजा बागवे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. ती तिचे विविध फोटो व व्हिडिओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टसंबंधीत माहिती चाहत्यांसोबत शेअर करत असते. ऋतुजाने नुकतीच एक आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. ही बातमी ऐकल्यावर चांहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ऋतुजा बागवेनं गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात तिच्या वाढदिवशी नवीन घर घेतल्याची बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. त्यादिवशी तिचं हे नवीन घर पहायला ती तिच्या कुटुंबियांसोबत गेली होती. त्यावेळचे काही फोटो तिने पोस्ट करत तिला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे तिने आभार मानले होते. आता तो फ्लॅट तिला मिळाला आहे. ही आनंदाची बातमी तिनं चाहत्यांसोबत शेअर केली आहे.
ऋतुजाने नुकतीच तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. या स्टोरीमध्ये तिच्या हातात नवीन घराच्या किल्ल्या दिसत आहेत. तर त्यापाठी दारावर ऋतुजा बागवे असं नाव लिहिलेलं देखील दिसत आहे. हा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं, “फ्लॅट मिळाला आता घर बनवायचंय.”
वाचा-राणी नावाप्रमाणेच 'राणी'; अलिशान घरे,लग्जरी गाड्या,अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती
यासोहतच तिनं गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिड्ओत ती तिचे आई-बाबा व तिच्या खास मित्रमंडळींबरोबर या तिच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत तिने लिहिलं, “शाळेत असताना बाबा ५रू. pocket money द्यायचे. ३रू. खर्च करुन २रू. piggy bank मधे ठेवायचे. कधी कधी काहीही न घेता ५रू. piggy bank मधे टाकायचे. ती सवय, स्वभाव, संयम, शिस्त, small sacrifices, आई बाबा आणि देवाची कृपा ह्यामुळे शक्य झालं.” तिच्या या व्हिड़िओवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तिचं अभिनंदन केलं आहे.
View this post on Instagram
प्रत्येकासाठी घर हे खासचं असतं. प्रत्येकाला वाटतं असते की आपलं लहान-मोठ एकतरी हक्काचं घर असावं. ऋतुजाने देखील तिच्या कमाईतून घर घेतलं आहे. तिच्या चेहऱ्यावरील तेज पाहूनच याची कल्पना करवत नाही की,ती किती आनंदात आहे. बालपणापासून बचतीची सवय असल्याने याचा उपयोग करून तिनं कसं घर घेतलं याबद्दलचं तिनं या पोस्टमधून सांगितलं आहे.
कोरोना काळानंतर आता सगळं सुरळीत झालं आहे. मनोरंजन विश्वात देखील नवीन प्रोजेक्ट सुरू झाले आहेत. अनेक कलाकार नवीन प्रोजेक्टवर काम करत आहेत. मराठी कलाविश्वातील अनेक सेलेब्सनी यंदा कोणी चारचाकी तर कोणी घर घेतले आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत अनेकजण याची माहिती देत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.