अभिनेत्रीची हळद पाहून येईल रंगपंचमीची आठवण; पाहा हा धम्माल Video

अभिनेत्रीची हळद पाहून येईल रंगपंचमीची आठवण; पाहा हा धम्माल Video

रुचिता ने मागील आठवड्यात उद्योजक आनंद माने याच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो (Ruchita Jadhav wedding) सध्या सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई 13 मे : लग्न समारंभ म्हटलं की मज्जा, मस्ती आणि धमाल या गोष्टी आल्याच. तर प्रत्येकाला आपला लग्नसोहळा हा लक्षात राहण्याजोगा करायचा असतो, यात काहीच नवल नाही. असंच काहीसं अभिनेत्री रुचिता जाधच्या (Ruchita Jadhav) लग्नसमारंभावरून दिसत आहे. सध्या तिच्या लग्नाची भलतीच चर्चा होत आहे. नुकताच रुचिता हा विवाहसोहळा पार पडला आहे.

रुचिता ने मागील आठवड्यात उद्योजक आनंद माने याच्याशी विवाह केला. त्यांच्या लग्नाचे फोटो (Ruchita Jadhav wedding) सध्या सोशल मीडियवर तुफान व्हायरल होत आहेत.

या व्यक्तीमुळं पाठकबाईंना मिळालं ‘तुझ्यात जीव रंगला’मध्ये काम

रुचिताचा लग्नसोहळ्यातील मनमोहक असा वधूचा लूक अनेकांना आवडला आहे. तर आता तिच्या लग्नातील इतर समारंभांचेही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत. नुकतचं तिने तिच्या हळदी समारंभाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. काही वेळातच या व्हिडीओ ला अनेक कमेंट्स मिळाल्या आहेत.

रुचिता आणि आनंदची हळद पाहून हा हळदी समारंभ आहे की रंगपंचमी असा प्रश्न नक्कीच मनात येईल, तर वधू वरासाह सगळेचजन या समारंभात आनंद लुटताना दिसत आहेत. एकमेकांना हळद लावत आहेत. रुचिताने हळदीसाठी सुंदर असा पिवळ्या रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे.

साताऱ्यातील (Satara) पाचगणीत हा संपूर्ण विवाह सोहळा पार पडला होता. कर मेहंदी, हळद, संगीत, लग्न, रिसेप्शन असा संपूर्ण संमारंभासहीत रुचिताने लगंन केलं. लॉकडाउनच्या कारणाने जवळच्या नातेवाईकांसाह पाचगणीतील एका फार्महाऊसवर हा सोहळा पार पडला होता.

रुचिता आणि आनंदने लग्नात सामाजिक भान राखत गरजूंना अन्नधान्य वाटप ही केलं होतं. पाचगणीच्या आजूबाजूच्या गावांमध्ये त्यांनी 1500 अनन्धान्याचे पॅकेट्स वाटले होते.

Published by: News Digital
First published: May 13, 2021, 5:43 PM IST

ताज्या बातम्या