मुंबई , 11 ऑक्टोबर : सैराट फेम आर्ची अर्थात मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू (Rinku Rajguru)सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. ती तिचे विविध फोटो , व्हिडिओ तसेच तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. सध्या रिंकू राजगुरूचा (Rinku Rajguru Gallery )योगा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तिला योगा करताना एक जण सारखं त्रास देताना दिसत आहे.
रिंकून तिच्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रिंकू योगा करताना दिसत आहे. परंतू योगा करताना एक मांजरीचे पिल्लू तिला त्रास देत आहे. ती करत असलेल्या योगासनांमध्ये ते छोटे मांजरीचे पिल्लू आडवं येत आहे. रिंकूने देखील या मांजरीच्या पिल्लास बाजूला करून योगा करण्याचे ठरवले मात्र मांजरीच्या पिल्लाने पण ठरवलं आहे की हिला आज योगा करू द्यायचाच नाही.
View this post on Instagram
हा व्हिडिओ शेअर करत रिंकूने “रविवार जेव्हा आपण खूप प्लान करतो पण त्यातील काहीच घडत नाही. ♀️ असे लिहत तिने त्यासोबत दोन इमोजीसुद्धा शेअर केल्या आहेत. त्यासोबतच #sundaymorningview असा हॅशटॅगसुद्धा दिला आहे. त्यासोबतच Rinku Mahadeo Rajguru #iamrinkurajguru #SairatGallery #RinkuRajguruGallery #SairatGalleryFansClub हे हॅशटॅगसुद्धा दिले आहेत.
वाचा :भार्गवी चिरमुलेने Navratri निमित्त नेसलेल्या 'या' साडीचं महत्त्व माहितेय का?
रिंकूचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे आणि चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव सुरूच आहे. आतापर्यंत 37 हजारा लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. तर या व्हिडीओवर लाईक्सचा पाऊस पडत आहे. एका फेसबुक यूजरने तर एक भन्नाट कमेंट केली आहे तिही आर्चीच्या भाषेत. त्याने म्हटले आहे की..तीला बोल मराठीत सांगितलेले कळत नाही का इंग्रजीत सांगू. तर दुसऱ्याने म्हटले आहे की, लव यू , माझ्याशी लग्न कर ” म्हणत तिला प्रपोज केले आहे.तर तिसऱ्याने म्हटले आहे की, मॅम हिला मराठी कळत नाही इंग्रजित सांगा, अशा एकापेक्षा एक कमेंटचा पाऊस सुरूच आहे.रिंकुला पाळीव प्राण्यांची खूप आवड आहे. अनेकदा ती सोशल मीडियावर मांजरी तसेच कुत्र्यांसोबतचे काही व्हिडिओ तसेच फोटो देखील शेअर करत असते.
रिंकूनं सैराटनंतर ‘कागर’, ‘मेकअप’, ‘अनपॉज’ अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केले व तिच्या अभिनयाचे कौतुक झाले. लवकरच ती ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा म्हणजे अभिनेता आकाश ठोसर देखील दिसणार आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Marathi actress, Marathi entertainment, Rinku rajguru