• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • रिंकूचा Traditional अंदाजही करेल घायाळ; नव्या सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो केले शेअर

रिंकूचा Traditional अंदाजही करेल घायाळ; नव्या सिनेमाच्या मुहूर्ताचे फोटो केले शेअर

सैराट फेम मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू ( Rinku Rajguru)सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ तसेच आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यासोबत शेअर करत असते.

 • Share this:
  मुंबई, 16 नोव्हेंबर- सैराट फेम मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू ( Rinku  Rajguru)सोशल मीडियावर नेहमी सक्रीय असते. तिचे विविध फोटो व व्हिडीओ तसेच आगामी प्रोजेक्टची माहिती चाहत्यासोबत शेअर करत असते. नुकतीच तीन तिच्या आगामी प्रोजेक्टविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली आहे. रिंकू राजगुरूने इन्स्टावर तिच्या आगामी प्रोजक्टची माहिती शेअर केली आहे. तिनं आगामी प्रोजेक्टच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. Project no 1 असं तिच्या आगामी प्रोजेक्टचं नाव आहे. रिंकूने या सिनेमाच्या मुहुर्ताचे फोटो शेअर केले आहेत. यावेळी रिंकू पारंपरिक पोशाखात दिसत आहे. सैराट, मेकअप आणि कागर नंतर रिंकू पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. रिंकू यामध्ये गुलाबी रंगाची साडी नेसली आहे. तिचा हा पारंपारिक अंदाज चाहत्यांना देखील आवडला आहे. रिंकूच्या या  आगामी प्रोजेक्टविषयी चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. रिंकूचा हा पारंपारिक लूक पाहून सर्वांना प्रश्न पडला आहे की, तिची भूमिका नेहमी या सिनेंमात कशी असणार आहे, अनेकांना रिंकूचा हा पारंपारिक अंदाज सैराटमध्ये देखील आवडला होता. आता पुन्हा तिला साडीत पाहून चाहत्यांना देखील आनंद झाला आहे.
  रिंकू राजगुरूने 'सैराट' या सिनेमाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण केले. तिला तिच्या पहिल्याच चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने कागर या चित्रपटात काम केले. रिंकूने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.  रिंकूचे दिवाळी फोटोशूट देखील सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले होते. या फोटोमध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. यासोबतच ती योगा व्हिडीओ देखील शेअर करत असते. सैराटनंतर रिंकूच्या लुकमध्ये प्रचंड बदल झालेला आहे. तीचं फोटोशूट सोशल मीडियावर नेहमीच लक्षवेधून घेत असतं. वाचा : विक्रम गोखले वडिलांच्या स्थानी, विचाराअंतीच बोलले असतील, अवधुत गुप्तेचं समर्थन यासोबतच लवकरच ती ‘झुंड’ या चित्रपटात दिसणार आहे. महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात आर्चीसोबत तिचा परशा म्हणजे अभिनेता आकाश ठोसर देखील दिसणार आहे. तसेच अभिनेते अमिताभ बच्चन हे सुद्धा या चित्रपटा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
  Published by:News18 Trending Desk
  First published: