मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'शनाया'ची आकाशात भरारी; विमान चालवतानाचा VIDEO केला शेअर

'शनाया'ची आकाशात भरारी; विमान चालवतानाचा VIDEO केला शेअर

रसिकानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे.

  • Published by:  Mandar Gurav

मुंबई 22 मार्च: ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Majhya Navryachi Bayko) या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रसिका सुनील (Rasika Sunil) ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. रसिका अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. यावेळी देखील तिनं असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये ती चक्क विमान चालवताना दिसत आहे. (Rasika Sunil Share Video while flying)

रसिकानं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती चक्क विमान उडवण्याचं प्रशिक्षण घेताना दिसत आहे. “जेव्हा मी विमान उड्डाणंचे धडे घेत होते.” अशा आशयाचं कॅप्शन देऊन तिनं हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत हजारो नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अवश्य पाहा - रणबीर-कतरिनाच्या नात्यात का आला दुरावा?; पाहा पडद्यामागील ब्रेकअप स्टोरी

View this post on Instagram

A post shared by Rasika Sunil (@rasika123s)

दोन वर्षांपूर्वी रसिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ ही मालिका सोडून लॉस एंजिलिसला पुढील शिक्षणासाठी गेली होती. त्याच वेळी तिनं हे विमान चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं होतं. तेव्हाचा व्हिडीओ रसिकानं शेअर केला आहे. या प्रशिक्षणादरम्यान तिची आणि आदित्य बिलागीची भेट झाली. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. अन् आता लवकरच ते लग्न करणार आहेत.

First published:

Tags: Entertainment, Funny video