ई, 25 सप्टेंबर 2021 ; मराठमोळ्या अभिनेत्री प्रिया बेर्डे (Priya Berde ) यांच्यावर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यांचा वाढदिवस असं काही नाही तर कारण दुसरेच आहे. प्रिया यांनी लोणावळ्यातील पौड रोडवर हॉटेल सुरू केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रिया बेर्डे पूर्वीपासून हॉटेल व्यवसायातही आहेत. बावधन परिसरात त्यांचं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये सुरुवातीला शाकाहारी खाद्य पदार्थ मिळू लागले त्यानंतर खवय्यांच्या आग्रहाखातर मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले. हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये जाऊन तिथले कामकाज पाहत असतात. त्याची चव चाकत असतात. त्यांच्याया हॉंटेलला अनेक कलाकार मंडळी भेट देत असतात. आता याच हॉटेलची म्हणजे ‘चख ले’ ची दुसरी शाखा सुरु केली आहे. या निमित्ताने सोशल मिडियावर चाहते त्यांचं अभिनंदन करत आहेत. यानिमित्त सर्वांना पंजाबी, ज्यूस तसेच पावभाजी अशा विविध चवी चाखता येणार आहेत. प्रिया यांनी सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
प्रिया बेर्डे यांनी Instagram वर हॉटेलचे पोस्टर शेअर करत म्हटले आहे की, आणि पुन्ह एकदा. प्रिया बेर्डेप्रमाणे मराठी मनोरंजन क्षेत्रातील अनेक कलाकारांचे स्व: ताचे व्यवसाय आहेत. यातून ही कलाकार मंडळी उत्तम पैसे देखील कमावताता . कुणाचा साड्यांचा तर कुणाचा हॉटेलाच असा अनेक व्यवसाय मराठी कलाकार करतात. आता हिंदी कलाकारांप्रमाणे मराठी कलाकार देखील उद्योग क्षेत्राकडे वळत आहेत ही चांगलीच गोष्ट आहे.
वाचा : Bigg Boss Marathi 3 : मीरा- उत्कर्षचे Gossip जरा ऐका ; 'या' दोघींना केलं आजीबाई तर शिवलीलाबद्दल केलं मोठं वक्तव्य
प्रिया बेर्डे या मूळच्या कोल्हापूरच्या आहेत. मग काय कोल्हापूर आणि खाण्याचे कनेक्शन जगात प्रसिद्ध आहे. म्हणून तर त्यांना खाणे आणि इतरांना खाऊ घालणे खूप आवडाते. कोल्हापूरचा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा बनवण्यात त्या अगदी पटाईत आहेत. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत लग्न झाल्यावर त्या सासरी गेल्यावर कोकणी पद्धतीचे जेवण बनवायला शिकल्या . शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने बनवून ते स्वादिष्ट कसे होतील यात त्यांचा हातखंडा आहे. त्यामुळे त्यांनी पुढे जाऊन हॉटेल व्यवसायात उतरण्याचे ठरवले. आणि लोणावळा परिसरातील बावधन परिसरात प्रिया बेर्डे यांनी चख ले या नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला.या हॉटेलमध्ये सुरुवातीला शाकाहारी खाद्य पदार्थ मिळू लागले त्यानंतर खवय्यांच्या आग्रहाखातर मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले. हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये जाऊन तिथले कामकाज पाहत असतात. त्याची चव चाकत असतात.या हॉटेलमध्ये सुरुवातीला शाकाहारी खाद्य पदार्थ मिळू लागले त्यानंतर खवय्यांच्या आग्रहाखातर मांसाहारी खाद्य पदार्थ देखील तिथे बनवले जाऊ लागले. हे हॉटेल स्वतः प्रिया बेर्डे चालवत नसल्या तरी अनेकदा त्या हॉटेलमध्ये जाऊन तिथले कामकाज पाहत असतात. त्याची चव चाखत असतात.
प्रिया बेर्डे यांची इन्स्टा पोस्ट
प्रिया बेर्डे यांनी काही दिवसापूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आता त्या राजकारणाच्या पटलावर देखील दिसणार आहेत. यासोबतच त्यांची दोन्ही मुलांनी देखील अभिनय क्षेत्रात करिअर करायचे ठरवले आहे. मुलगा अभिनय बेर्डेने तर काही मराठी सिनेमात काम देखील केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.