मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्रिया बापट जिममध्ये गाळतेय घाम; अभिनेत्रीचा Box Jump व्हिडीओ झाला VIRAL

प्रिया बापट जिममध्ये गाळतेय घाम; अभिनेत्रीचा Box Jump व्हिडीओ झाला VIRAL

नुकताच अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा एक्सरसाईज व्हिडीओ आहे.

नुकताच अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा एक्सरसाईज व्हिडीओ आहे.

नुकताच अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा एक्सरसाईज व्हिडीओ आहे.

  • Published by:  Aiman Desai
मुंबई, 15 जुलै- आजकाल प्रत्येक अभिनेत्री फिटनेस (Fitness) फ्रिक बनल्या आहेत. सतत त्या वर्कआउट करून जिममध्ये घाम गाळताना दिसतात. तसेच सोशल मीडियावरसुद्धा त्यांचे बरेच व्हिडीओ आणि फोटो व्हायरल होतं असतात. यातीलचं एक मराठमोळी अभिनेत्री म्हणजे प्रिया बापट (Priya Bapat) होय. नुकताच प्रियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येत आहे. यामध्ये ती हार्ड असं जिम वर्कआउट करत आहे. या व्हिडीओमध्ये प्रिया बॉक्स जम्प (Box Jump) मारताना दिसत आहे.
View this post on Instagram

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

नुकताच अभिनेत्री प्रिया बापटने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा एक्सरसाईज व्हिडीओ आहे. यामध्ये प्रिया बॉक्स जम्प मारताना दिसत आहे. प्रियाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. प्रियाचे चाहते हा व्हिडीओ पाहून तिचं कौतुक करत आहेत. हा व्हिडीओ चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. प्रिया सध्या फिटनेसकडे खुपचं लक्ष देत आहे. (हे वाचा: अंकिताने पहिल्यांदाचं केली कोरोना चाचणी; पाहा 'पवित्र रिश्ता 2' सेटवरचा VIDEO) लॉकडाऊनमध्ये सर्वच शुटींग बंद असल्याने, या अभिनेत्रींकडे पुरेसा वेळ उपलब्ध होता. याच वेळेचा वापर करत, या अभिनेत्रींनी आपल्या फिटनेसकडे लक्ष केंद्रित केलं आहे. बॉलिवूडसारखच मराठी चित्रपटसृष्टीतदेखील प्रत्येक अभिनेत्री हार्ड वर्कआउट करत आपल्या फिटनेसची पुरेपूर काळजी घेत आहे. अभिनेत्री अमृता खानविलकर ते सोनाली कुलकर्णी प्रत्येक अभिनेत्रीने लॉकडाऊनमध्ये आपल्या फिटनेसला प्राधान्य दिलं आहे. (हे वाचा: संजीवनी रणजीतच्या हातात घालणार बेड्या; 'राजा राणी..' मध्ये येणार मोठा ट्वीस्ट) अभिनेत्री प्रिया बापट सोशल मीडियावर खुपचं सक्रीय असते. ती सतत आपले खाजगी फोटो आणि विविध व्हिडीओ चाह्त्यानांशी शेयर करत असते. शिवाय प्रिया आणि पती उमेश कामतची जोडी सोशल मीडियावर खुपचं पसंत केली जाते. या दोघांचा महाराष्ट्रात मोठा चाहता वर्ग आहे. तसेच उमेश सध्या मुक्ता बर्वेसोबत ;अजूनही बरसात आहे’ या मालिकेत काम करत आहे.
First published:

Tags: Marathi entertainment, Priya bapat

पुढील बातम्या