मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्राजक्ता माळी सांगणार आपलं गुपित; लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास

प्राजक्ता माळी सांगणार आपलं गुपित; लवकरच घेऊन येतेय काहीतरी खास

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट खुपचं खास आहे.

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट खुपचं खास आहे.

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट खुपचं खास आहे.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 14 जुलै- अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajkta Mali) नेहमीचं आपल्या चाहत्यांसाठी काही ना काही खास गोष्टी करत असते. फक्त मालिका आणि चित्रपटचं नव्हे तर ती सोशल मीडियावरसुद्धा खुपचं सक्रीय असते. तसेच ती सोशल मीडियावरून अनेक आरोग्यासंबंधी किंवा इतर उपयोगी टिप्ससुद्धा देत असते. तसेच अभिनेत्री प्राजक्ता माळी लवकरच आपल्या चाहत्यांसाठी काहीतरी खास घेऊन येणार आहे. प्राजक्ताने आपल्या सोशल मीडियावरून पोस्ट शेयर (Instagram Post) करत याबद्दलची माहिती दिली आहे.

प्राजक्ता माळी मराठीमधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’ तसेच ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मालिकांमधून तिला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. प्राजक्ताचा मोठा चाहतावर्ग आहे. तिचे सोशल मीडियावरसुद्धा खुपचं चाहते आहेत. ते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात.

(हे वाचा: डॉक्टरची तुरुंगातून झाली सुटका; 'देवमाणूस' मालिकेत नवं वळणं )

प्राजक्ताने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट शेयर केली आहे. ही पोस्ट खुपचं खास आहे. यामध्ये प्राजक्ताने एका डायरीचा फोटो शेयर केला आहे. तसेच त्यावर लिहिलं आहे, ‘प्राजक्ताकडून लवकरच एक सुंदर भेट’. यावरून असं दिसून येत आहे की प्राजक्ता लवकरच आपलं काहीतरी खास लिखाण आपल्यासाठी घेऊन येणार आहे. तसेच प्राजक्ताने या पोस्टला कॅप्शन देत म्हटलं आहे, ‘माझ्या ह्रदयाच्या अतिशय जवळ असलेली गोष्ट…माझी गूपीतं म्हणा हवं तर…लवकरच….खास तूमच्यासाठी.

(हे वाचा:VIDEO: 'बहुत खूबसुरत हो'; श्रुती मराठेचा साडी LOOK पाहून चाहते पडले प्रेमात  )

प्राजक्ताची ही पोस्ट पाहून चाहते खुपचं उत्सुक झाले आहेत. आपली लाडकी अभिनेत्री आपल्याला आपलं गुपित सांगणार म्हटल्यावर चाहत्यांना फारच आनंद झाला आहे. आता प्राजक्ता नक्की काय सांगणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.

First published:

Tags: Marathi actress, Tv actress