मुंबई, 18 मार्च- प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. प्राजक्ता नेहमीच तिच्या हटके पोस्टनी चाहत्यांचे लक्षवेधून घेत असते. यंदाचं वर्ष प्राजक्तासाठी खास होतं असचं म्हणावं लागेल. या वर्षात तिला झी युवा सन्मान २०२३ चा तेजस्वी चेहरा' हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या सोहळ्यावेळी प्राजक्ताला प्रेम की करिअर असे विचारण्यात आले. यावेळी प्राजक्ता प्रेम या विषयावर मनमोकळेपणाने बोलली. सध्या तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
प्राजक्ता माळीनं इन्स्टाग्रामवर तिचा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, प्रेम की करिअर..प्राजक्तासाठी अधिक महत्त्वाचं काय? तुम्हीच ऐका! या मुलाखतीत प्राजक्ताला प्रेम की करियर असे विचारण्यात आले, त्यावर ती म्हणाली.. 'प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. मोठ्यातला मोठा डोंगरही हलवू शकतो प्रेमाने. पण आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते फार उथळ वाटतं मला. तडजोड केलेलं वाटतं कधी पैशांसाठी, कधी भविष्याचा विचार करून, इमोशनल, रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला काहीतरी पाहिजे म्हणून लोकांना प्रेम हवं आहे. हल्ली प्रेम या पातळीपर्यंत झुकतंय की काय असं कधीतरी वाटतं असल्याचं देखील प्राजक्ता म्हणली.
वाचा-लाईमलाईटपासून लांब बिग बॉसची विनर असं जगतेय आयुष्य, व्हिडिओ आला समोर
प्राजक्ता पढे म्हणाली की, पण मला माहितीये की खरं प्रेम आजही आहे. त्यामुळे करिअर अणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे. कारण मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये माझ्यासाठी. ती माझी जीवन पद्धती आहे.कलाक्षेत्रात काम करणं आणि समाजभान बाळगून काहीतरी करणं हे वायरिंग माझ्यात वरूनच आलंय, त्याचं मी काही करू शकत नाही. मी एवढे एवढे पैसे कमावेन आणि घरी बसेन असं कधीच नाही होणार. किंवा एवढ्या फिल्म केल्या आणि झालं आता असं कधीच नाही होणार. त्यामुळे करिअरची व्याख्या पण माझी वेगळी आहे. सतत काहीतरी करत राहणं ही माझी गरज आहे त्यामुळे नक्कीच मी करिअर निवडेन.
View this post on Instagram
प्राजक्ता माळीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट करत तिचं पुरस्कार मिळाल्याबद्दल कौतुक केलं. शिवाय तिच्या निर्णयाबद्दल देखील पाठींबा दर्शवला आहे.
प्राजक्ता माळीनं यंदा वेबसीरीजमध्ये एक वेगळी भूमिका साकारत अभिनेत्री म्हणून स्वताला सिद्धध केलं. शिवाय तिनं तिचा दागिन्याचा व्यवसाय देखील सुरू केला. मध्यंतरी ती या सगळ्या तिच्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून तिचे गुरू रवीशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी तिनं त्यांनालग्न करावं की नाही याबाबत विचारलं होतं. तेव्हा देखील प्राजक्ताच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. आता तिच्या हा नवीन व्हिडिओ देखील चर्चेत आला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.