Home /News /entertainment /

'माझी आई काळुबाई' मालिकेच्या वादानंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली प्राजक्ता गायकवाड

'माझी आई काळुबाई' मालिकेच्या वादानंतर वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली प्राजक्ता गायकवाड

माझी आई काळुबाई (Majhi aai Kalubai) मालिकेतील वादानंतर अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

  मुंबई, 24 नोव्हेंबर: स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेमधून अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Prajkta Gaikwad) महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. त्यानंतर माझी आई काळूबाई (Majhi Aai Kalubai) या मालिकेतील वादामुळे ती चर्चेत आली. प्राजक्ता गायकवाड आणि अलका कुबल यांचा वाद शिगेला पोहोचला होता. आता ही अभिनेत्री पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण याचं कारण वेगळं आहे. प्राजक्ता नुकतीच जेजुरीला गेली होती. यळकोट यळकोट जय मल्हारच्या गजरात तिने खंडोबाचं दर्शनही घेतलं. खंडेरायाच्या मंदिरातील तिने शेअर केलेल्या एका फोटोने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. खंडेरायाची 42 किलो वजनाची तलवार तिने उचलल्याचा फोटो व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे.
  हा फोटो पाहून अनेक नेटकऱ्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या वेळी प्राजक्ता घोडेस्वारी शिकली होती. तिने तलवारबाजीचं प्रशिक्षणही घेतलं होतं.
  प्राजक्ता गायकवाड सध्या इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. माझी आई काळुबाई ही मालिका सोडताना प्राजक्ताने मालिकेच्या टीमवर वेगवेगळे आरोप केले होते. “मालिकेच्या टीमशी संबंधित असलेल्या विवेक सांगळे या व्यक्तीने आम्ही एकत्र प्रवास करत असताना मला शिवीगाळ केली होती." असा आरोप तिने केला. तर विवेक सांगळे या अभिनेत्याने प्राजक्ताला शिवीगाळ केली नसून ती दुसऱ्या व्यक्तीला केली होती. अशी बाजू मालिकेच्या टीमकडून मांडली गेली होती. माझी आई काळूबाई मालिकेला रामराम ठोकल्यानंतर तिने अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं आहे. प्राजक्ता आता कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार? याकडे तिच्या चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
  Published by:Amruta Abhyankar
  First published:

  Tags: Marathi entertainment

  पुढील बातम्या