Home /News /entertainment /

कुणाला नाय जमलं ते प्राजक्ताला जमलं, अखेर 'व्वा दादा व्वा' म्हणत सौरभ गांगुलींना दिला सदरा गिफ्ट !

कुणाला नाय जमलं ते प्राजक्ताला जमलं, अखेर 'व्वा दादा व्वा' म्हणत सौरभ गांगुलींना दिला सदरा गिफ्ट !

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणा-या प्राजक्ताच्या तोंडून सर्वांना व्वा दादा व्वा, असं बऱ्याचदा ऐकले असले. मध्यंतरी यावरून काही मीम्स देखील व्हायरल झाले होते.

  मुंबई, 9 डिसेंबर - अभिनयाने आणि सौंदर्याने चाहत्यांना भुरळ पाडणारी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणा-या प्राजक्ताच्या तोंडून सर्वांना व्वा दादा व्वा, असं बऱ्याचदा ऐकले असले. मध्यंतरी यावरून काही मीम्स देखील व्हायरल झाले होते. आता प्राजक्ताने एक लयभारी काम केले आहे. विश्वास बसणार नाही पण प्राजक्ताने क्रिकेट जगतातील दादाला (  sourav ganguly) चक्क 'व्वा दादा व्वा' छापलेल्या मजकुराचा सदरा गिफ्ट केला आहे. प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टावर एक मजेशीर फोटो शेअर केला आहे. या मजेशीर फोटोवर कमेंट देखील तितक्याच मजेशीर येत आहेत. प्राजक्ता या फोटोत क्रिकेट जगाताली दादा सौरभ गांगुली यांना व्वा दाद व्वा हा मजकूर लिहिलेला शर्ट देताना दिसत आहे. हा फोटो क्रॉफ केलेला आहे. चाहत्यांना मात्र तिची गंमत खूपच आवडलेली आहे. अनेकांना व्वा प्राजून व्वा असं म्हणत या मीम्सचा आनंद घेतला आहे. या मीम्सला देखील भन्नाट कॅप्शन दिली आहे. म्हटलं आहे की, क्रिकेट जगतात दादा म्हणून ओळखले जाणारे सौरभ गांगुली यांना सदरा प्रधान करताना आपली लाडकी प्राजू...
  यापूर्वीही प्राजक्ताने तिच्या इन्स्टा अकाऊंटवर स्वत:वरचे काही भन्नाट व मजेशीर मीम्स शेअर केले आहेत. मालिका, नाटक आणि सिनेमा अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये प्राजक्ताने विविध भूमिका साकारल्या आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. वाचा : ज्युनियर एनटीआर - राम चरणच्या 'RRR' चा शहारे आणणारा Trailer तिने यानंतर हम्पी, डोक्याला शॉट यांसारख्या चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या. सध्या प्राजक्ता छोट्या पडद्यावरील कॉमेडी शो ‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’चे सूत्रसंचालन करताना दिसते आहे. 2011 साली ‘सुवासिनी’ या मालिकेतून प्राजक्ताने छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Cricket news, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sourav ganguly

  पुढील बातम्या