मुंबई, 26 डिसेंबर: मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) सध्या भलतीच खूश आहे. कारण तिच्या घरी एका चिमुकल्या पाहुणीचं आगमन झालेलं आहे. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. तिने ही गोड बातमीदेखील तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन दिली आहे. तिच्या या फोटोला काही तासांतच भरपूर लाइक्स मिळाले आहेत.
काय आहे प्राजक्ताची पोस्ट?
अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरील पोस्टमध्ये लिहीलं, ‘आता माझं social media attention खाऊन टाकायला (‘गोबरे गाल’ परंपरा जपणारी) माझी दुसरी भाचीही सज्ज झाली. जे मला फारच आवडणारे. शिवप्रिया. हो, काही कारणांमुळे नाव शिवप्रिया ठेवलं. त्यामुळे आता ‘हंसिनी, कात्यायिनी, हंसा, रूद्राणी, सुभद्रा’ ही नावं तुम्ही घेऊ शकता.' असं लिहीत तिने हॅशटॅग वापरत शिवप्रिया असंही लिहीलं आहे. तिची भाची अतिशय गोंडस आहे. या फोटोमध्ये प्राजक्ताने पोपटी रंगाची साडी नेसली आहे. मराठमोळा लूक तिच्यावर फारच सुंदर दिसत आहे. प्राजक्ताने फोटो शेअर करताच, ‘चाहत्यांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.’
View this post on Instagram
प्राजक्ताच्या या फोटोला चक्क 1 लाख 25 हजार लाइक्स आले आहेत. प्राजक्ता माळीचं नाव मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये घेतलं जातं. जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून प्राजक्ताला खरी ओळख मिळाली. तिने हंपी, डोक्याला शॉट अशा चित्रपटांमध्येही नाव गाजवलं आहे.
View this post on Instagram
View this post on Instagram
प्राजक्ता एक उत्तम अभिनेत्री तर आहेच शिवाय उत्तम भरनाट्यम नृत्यांगनाही आहे. महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोचं सध्या प्राजक्ता सूत्रसंचालन करत आहे. डान्स असो, अभिनय असो किंवा सूत्रसंचालन प्राजक्ता सगळ्याच क्षेत्रात जीव ओतून काम करते.