मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'आनंद पोटात माझ्या मायेना!' मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली पोस्ट

'आनंद पोटात माझ्या मायेना!' मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर अभिनेत्री प्राजक्ता माळीने केली पोस्ट

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (CM Uddhav thackeray) भेट झाल्यानंतर प्राजक्ता माळीच्या (Prajakta mali) आनंदाला पारावर उरला नाही.

  • Published by:  Priya Lad

मुंबई, 08 जुलै :  मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट (Actress Prajakta Mali meet Chief Minister Uddhav Thackeray) घेतली आहे. तिने मुख्यमंत्र्यासोबतच्या भेटीचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. एका खास कॅप्शनसह तिने ही पोस्ट केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर प्राजक्ताला इतका आनंद झाला आहे की आनंद पोटात माझ्या मायेना असंच ती म्हणाली आहे.

प्राजक्ता माळी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमध्ये सूचसंचालन करते. या शोमधील टीमचा सत्कार करण्यात आला आहे.  शोची पूर्ण टीम वर्षावर गेली होती. त्यावेळी प्राजक्ताची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली.

प्राजक्ता माळीने पोस्टमध्ये सांगितलं, "मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्यांची भेट झाली. तीही ‘वर्षा’ वर. असं सांगताना तिने आनंद पोटात माझ्या मायेना असा हॅशटॅगही दिला आहे. साहेबांच्या हस्ते हास्यजत्रेच्या कलाकारांचा सत्कार करण्यात आल्याचं तिनं सांगितलं.

"व्यस्त वेळापत्रकातून सबंध एक तास आम्हाला दिल्याबद्दल. मनापासून कौतुक करून उत्साह वाढवल्याबद्दल धन्यवाद", असं म्हणत प्राजक्ताने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.  सोबतच ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांचा उल्लेख करत तिने त्यांचेही आभार व्यक्त केले आहेत.

हे वाचा - VIDEO : रितेश-जेनेलियाचा सुरू होता रोमान्स; दोघात तिसरा 'तो' आला आणि लागली वाट

ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळ्ये यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 'माझा पुरस्कार'साठी यंदा सोनी मराठीवरील 'महाराष्ट्राची हास्य जत्रा'मधील कलाकारांची निवड करण्यात आली होती. या सर्व कलाकारांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार आणि पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर हा कार्यक्रम पार पडला.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Uddhav thackeray