मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'प्राजक्ता माळीची झोप नेमकी कोणामुळं उडाली आहे..' अभिनेत्री खरचं आहे का प्रेमात?

'प्राजक्ता माळीची झोप नेमकी कोणामुळं उडाली आहे..' अभिनेत्री खरचं आहे का प्रेमात?

आता प्राजक्ताची कोणामुळं तरी झोप उडाली आहे..ही व्यक्ती कोण आहे. असा सर्वांना प्रश्न पडला आहे. तिनं एक पोस्ट केली आहे, ज्याला दिलेल्या कॅप्शनमुळं प्राजक्ताबद्दल सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

आता प्राजक्ताची कोणामुळं तरी झोप उडाली आहे..ही व्यक्ती कोण आहे. असा सर्वांना प्रश्न पडला आहे. तिनं एक पोस्ट केली आहे, ज्याला दिलेल्या कॅप्शनमुळं प्राजक्ताबद्दल सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

आता प्राजक्ताची कोणामुळं तरी झोप उडाली आहे..ही व्यक्ती कोण आहे. असा सर्वांना प्रश्न पडला आहे. तिनं एक पोस्ट केली आहे, ज्याला दिलेल्या कॅप्शनमुळं प्राजक्ताबद्दल सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 2 एप्रिल- अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिच्या फोटोशूटमुळे तर कधी फोटो कॅप्शननं ती सर्वांचे लक्षवेधून घेत असते. आता प्राजक्ताची कोणामुळं तरी झोप उडाली आहे..ही व्यक्ती कोण आहे. असा सर्वांना प्रश्न पडला आहे. तिनं एक पोस्ट केली आहे, ज्याला दिलेल्या कॅप्शनमुळं प्राजक्ताबद्दल सोशल मीडियावर वेगळीच चर्चा रंगलेली आहे.

प्राजक्ता माळीन इन्स्टाग्रामवर तिचे दोन फोटो पोस्ट केले आहेत. यामध्ये तिनं मस्त अशी साडी नेसली आहे आणि ती खूप सुंदर देखील दिसत आहे. तिनं या फोटोला सुंदर अशी कॅप्शन देखील दिली आहे. तिनं म्हटलं आहे की, तुम्हें याद करते करते..जायेगी रैन सारी..।तुम ले गये हो अपने ...संग नींद भी हमारी..। तिनं पोस्ट केलेल्या शायरीवरून तर असचं वाटत आहे की, प्राजक्ताला कोणाची तरी आठवण झाली आहे आणि त्यामुळं तिची झोप पूर्णपणे उडाली आहे..तो व्यक्ती कोण आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना देखील पडला आहे. शिवाय प्राजक्ता प्रेमात आहे का..असा प्रश्न देखील चाहत्यांना सतावत आहे. तिचा हा शायराना अंदाज चाहत्यांना देखील भावला आहे.

वाचा-मनसेच्या नव्या गाण्यावर प्राजक्ता माळीचा नादखुळा डान्स, व्हिडिओ होतोय व्हायरल

प्राजक्ताच्या या प्रश्नावर चाहत्यांनी कमेंट करत तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला आहे. एका चाहत्यानं म्हटलं आहे की, तुम्हें नींद नहीं आती तो कोई और वजह होगी.. अब हर ऐब के लिए कसूरवार इश्क़ तो नहीं..!❤️ तर आणखी एकानं म्हटलं आहे की,बाई ग... कसं करमत न्हाई ग ... बाई ग !!! तर आणखी एकानं म्हटलं आहे की, दिल ढूंढता है, फिर वही फुरसत के रात दिन।..प्राजक्ताची जी स्थिची सध्या आहे त्यावरून चाहत्यांनी तिला कमेंट केल्या आहेत. सध्या तिची ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.

प्रेम की करिअर प्राजक्ताच्या दृष्टीनं नेमकं काय महत्त्वाचं?

प्राजक्ता माळीनं काही दिवसापूर्वी एक मुलाखतीत प्रेमाबद्दल तिचं मत व्यक्त केलं होतं. या मुलाखतीत प्राजक्ताला प्रेम की करियर असे विचारण्यात आले होते, त्यावर ती म्हणाली होती की,. 'प्रेम ही आयुष्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट आहे. माझा प्रेमावर विश्वास आहे. सगळ्यात शक्तिशाली गोष्ट आहे. मोठ्यातला मोठा डोंगरही हलवू शकतो प्रेमाने. पण आता आपण अवतीभवती प्रेम बघतो ते फार उथळ वाटतं मला. तडजोड केलेलं वाटतं कधी पैशांसाठी, कधी भविष्याचा विचार करून, इमोशनल, रडायला खांदा पाहिजे, समाजाला दाखवायला काहीतरी पाहिजे म्हणून लोकांना प्रेम हवं आहे. हल्ली प्रेम या पातळीपर्यंत झुकतंय की काय असं कधीतरी वाटतं असल्याचं देखील प्राजक्ता म्हणाली होती.पण मला माहितीये की खरं प्रेम आजही आहे. त्यामुळे करिअर अणि प्रेम यामध्ये निवड करणं अवघड आहे.

कारण मी जे करतेय ते फक्त करिअर नाहीये माझ्यासाठी. ती माझी जीवन पद्धती आहे.कलाक्षेत्रात काम करणं आणि समाजभान बाळगून काहीतरी करणं हे वायरिंग माझ्यात वरूनच आलंय, त्याचं मी काही करू शकत नाही. मी एवढे एवढे पैसे कमावेन आणि घरी बसेन असं कधीच नाही होणार. किंवा एवढ्या फिल्म केल्या आणि झालं आता असं कधीच नाही होणार. त्यामुळे करिअरची व्याख्या पण माझी वेगळी आहे. सतत काहीतरी करत राहणं ही माझी गरज आहे त्यामुळे नक्कीच मी करिअर निवडेन, असं प्राजक्ता माळी तिच्या मुलाखतीमध्ये म्हणाली होती.

प्राजक्ता माळीनं यंदा वेबसीरीजमध्ये एक वेगळी भूमिका साकारत अभिनेत्री म्हणून स्वताला सिद्धध केलं. शिवाय तिनं तिचा दागिन्याचा व्यवसाय देखील सुरू केला. मध्यंतरी ती या सगळ्या तिच्या बिजी शेड्यूलमधून वेळ काढून तिचे गुरू रवीशंकर यांची भेट घेतली होती. यावेळी तिनं त्यांनालग्न करावं की नाही याबाबत विचारलं होतं. तेव्हा देखील प्राजक्ताच्या या प्रश्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment