फॅशन डिझायनरला मारहाण: पब्लिसिटीसाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे- प्राजक्ता माळी

मारहाण प्रकरणी प्राजक्ताविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 10, 2019 02:24 PM IST

फॅशन डिझायनरला मारहाण: पब्लिसिटीसाठी माझ्या नावाचा वापर केला जात आहे- प्राजक्ता माळी

मुंबई, १० एप्रिल- 'हम्पी', 'संघर्ष', 'खो- खो' यांसारख्या सिनेमांमध्ये तसंच 'जुळून येती रेशीम गाठी' आणि 'नकटीच्या लग्नाला यायचं हं' यांसारख्या मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात एका फॅशन डिझायरने शिवागाळ आणि मारहाण केल्याचा आरोप केला. या प्रकरणी प्राजक्ताविरोधात काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.


फॅशन डिझायनर जान्हवी मनचंदाच्या अंगावर नखांचे ओरखडे असलेला फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याशिवाय दोघींचे व्हॉट्सअप मेसेजचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.


प्राजक्ताने अगदी शुल्लक कारणावरून मारहाण केल्याचा आरोप जान्हवीने केला आहे. मात्र प्राजक्ताने हे सर्व आरोप फेटाळून लावले असून न्यूज१८ लोकमतशी बोलताना प्राजक्ता म्हणाली की, ‘माझ्यात आणि जान्हवीमध्ये कपड्यांवरून वाद झाले हे खरं असलं तरी मी तिला कोणतीही मारहाण केलेली नाही. हे सर्व ती पब्लिसिटीसाठी करत आहे. माझ्यासाठी हे इतकं नगण्य आहे की मला यावर फार काही बोलायचंही नाही.’

Loading...


प्राजक्ताने जरी या आरोपांमध्ये तथ्य नसलं असं सांगितलं असलं तरी जान्हवीने केलेल्या आरोपांनुसार पोलिसांनी पाजक्ता माळीविरोधात कलम ३२३ आणि ४०४ अंतर्गत तक्रार दाखल केली आहे.

VIDEO: काउंटडाउन सुरू; पहिल्या टप्प्यासाठी निवडणूक प्रशासन सज्ज


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 10, 2019 01:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...