मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Prajakta Mali : 'मी डायनिंग टेबलवर जेवतच नाही'; मग नक्की कशासाठी करते याचा वापर? जाणून घ्या

Prajakta Mali : 'मी डायनिंग टेबलवर जेवतच नाही'; मग नक्की कशासाठी करते याचा वापर? जाणून घ्या

प्राजक्ता माळी होम टूर

प्राजक्ता माळी होम टूर

प्राजक्ता माळी आजवर स्वत:चे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर करत आली आहे. मात्र आज तिनं तिच्या घराची सफर चाहत्यांना घडवली आहे. घरातील तिची आवडती जागाही तिनं दाखवलीये.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Minal Gurav

मुंबई, 04 ऑक्टोबर : अभिनेत्री प्राजक्ता माळी नुकतीच लंडनहून परत आली आहे. नव्या सिनेमाच्या शुटींगसाठी प्राजक्ताला 15 दिवस लंडनमध्ये होती.  लंडनहून परत येताच प्राजक्तानं महाराष्ट्राची हास्यजत्राचं शुटींग सुरू केलं आहे. लंडनवारीनंतर प्राजक्तानं तिच्या चाहत्यांना तिच्या घराची सफर घडवली आहे.  सोनी मराठीबरोबर प्राजक्तानं तिच्या आलिशान घराची सफर चाहत्यांना दिली आहे. या सफरीत प्राजक्ताच्या घरातील अनेक गोष्टी चाहत्यांना पाहायला मिळाल्यात. प्राजूनं तिचं घर फार उत्तमरित्या सजवलं आहे. घरात अनेक वस्तू पाहायला मिळतात. घरात एंट्री करताच समोर पुस्तकांचा खनिजा पाहायला मिळतो. घरातील प्राजक्ताची सर्वात आवडीची जागाही तिनं प्रेक्षकांना दाखवली आहे.

घरातील डायनिंग टेबल ही प्राजक्ताची आवडीची जागा आहे. डायनिंग डेबल म्हणजे जेवणाचं टेबल. तिथे मस्ता आरामात जेवण करणं यासाठी त्याचा वापर होतो. पण प्राजक्ता मात्र तिच्या डायनिंग टेबल जेवतच नाही. हो तिनं स्वत: तिच्या होम टूरमध्ये हे सांगितलं आहे. डायनिंग टेबलवर जेवत नाही मग प्राजक्ता डायनिंग डेबल नक्की करते काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

हेही वाचा - Prajakta Mali : महाराष्ट्राच्या लाडक्या प्राजक्ता माळीचं 'हे' आहे आवडतं वाक्य; वाचून तुम्हीही म्हणाल वा दादा वा!

घराची टूर देत असताना प्राजक्ता तिच्या डायनिंग टेबलजवळ आली. प्राजक्ता म्हणाली, 'हा माझा डायनिंग टेबल आहे पण मी यावर जेवतच नाही. इथे मी काम करते. मी अनेक गोष्टी विसरते. त्यामुळे इथे बसून मी डायरीमध्ये गोष्टी लिहून ठेवते. कोणाला पैसे द्यायचे आहेत. काय करायचं आहे. कोणाला फोन करायचा आहे अशी सगळी काम मी या डायनिंग टेबलवर बसून करते'.

त्याचप्रमाणे प्राजक्ता पुढे म्हणाली, 'डायनिंग टेबलवर जेवणा व्यतिरिक्त मी खूप वेळ घालवते. छोटे फोन कॉल्स मी इथे बसून करते. आईशी बोलताना मात्र मला इथे बसता येत नाही. ते मी घरभर फिरत फिरत आईबरोबर बोलते. त्यामुळे घरातील डायनिंग टेबलवर माझा सर्वाधिक वेळ जातो'.

प्र

प्राजक्ताच्या घरात अनेक जुन्या आणि पारंपरिक त्याही पेक्षा सर्वसामान्यांच्या घरात असणाऱ्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. अगदी देवाचा देव्हारा ते महालक्ष्मी दिनदर्शिका प्राजक्ताच्या घरी आहे.

प्राजूच्या या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी मात्र भन्नाट कमेंट्स केल्या आहेत. एका युझरनं म्हटलंय, 'प्राजक्ताची डायरी पळवून आणली पाहिजे, काय काय लिहिलय , कोणा कोणाचे पैसे येणं आहे, ते तरी बघू'. तर दुसऱ्या चाहत्यानं म्हटलंय, 'फरसाण चा खर्च लिहिला असेल'. आणखी एका चाहत्यानं 'व्वा प्राजु घर सुंदर आहे आणि तू मेकअपशिवाय अधिक सुंदर दिसतेस तू', असं म्हणत कौतुक केलं आहे.

First published:

Tags: Marathi actress, Marathi entertainment, Marathi news