मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

प्राजक्ताचा नवा लुक सोशल मीडियावर हिट! साध्याच पेहरावात दिसतेय कडक

प्राजक्ताचा नवा लुक सोशल मीडियावर हिट! साध्याच पेहरावात दिसतेय कडक

'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे (Marathi Serial) प्राजक्ता (Prajakta) रसिकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. तिचं नवं फोटो शूट सोशल मीडियावर हिट झालंय.

  • Published by:  News18 Desk

मुंबई, 4 फेब्रुवारी : मराठी सेलिब्रिटी (Marathi celebrity) सोशल मीडियावर (social media) चांगलेच सक्रिय असतात. त्यापैकीच एक नाव म्हणजे प्राजक्ता माळी (Prajakta Mali) . 'जुळून येती रेशीमगाठी' या मालिकेमुळे (Marathi Serial) प्राजक्ता रसिकांमध्ये खूप लोकप्रिय झाली. त्यानंतर 'हम्पी', 'डोक्याला शॉट' अशा चित्रपटांमध्ये (cinema) तिनं खूप चांगल्या भूमिका केल्या.

प्राजक्तानं नुकताच इन्स्टाग्रामवर (Instagram) एक मस्त फोटो (photo) शेअर केला आहे. केवळ चार तासांपूर्वी शेअर केलेल्या या फोटोला 55 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अनेकांनी प्राजक्ताच्या सौंदर्यासह अभिनयाचं कौतुक करणाऱ्या कमेंट्सही या फोटोवर केल्या आहेत. प्राजक्तानं फ्लोरल डिझाईनचा टॉप घातला आहे. केस मोकळे सोडले आहेत. शिवाय मोजकाच मेकअप आणि मोजक्या ऍक्सेसरीज तिनं घातलेल्या दिसतात. 'आओ ना... गले लगाओ ना.. लगी बुझा दो ना..' असं कॅप्शनही तिनं फोटोला दिलं आहे.

प्राजक्ता सोशल मीडियावर स्वतःच्या फोटोंसह कुटुंबियांचे फोटोज, चित्रीकरणावेळीचे (shooting) निवडक फोटोजही टाकत असते. विशेषतः या अभिनेत्रीनं पारंपरिक साडी नेसत केलेलं फोटोशूट (Photo shoot) काही काळापूर्वी सोशल मीडिया युजर्सना खूप आवडलं होतं.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'चे प्राजक्ता करत असलेलं खुमासदार सूत्रसंचालन रसिकांनी अगदी डोक्यावर घेतलं आहे. छोटा पडदा असो, की सिनेमा, प्राजक्ताचा अभिनय सतत लक्षवेधी ठरत आला आहे. अगदी काही दिवसांपूर्वीच प्राजक्तानं 'लॉकडाऊन' या सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. या सिनेमात प्राजक्तासोबत अंकुश चौधरी मुख्य भूमिकेत असणार आहे.

First published:

Tags: Instagram, Photo