मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

'तुम्हाला अस्वस्थ वाटतं...'; पुजा सावंतनं सांगितलं अस्वस्थ वाटण्यामागचं नेमकं कारण

'तुम्हाला अस्वस्थ वाटतं...'; पुजा सावंतनं सांगितलं अस्वस्थ वाटण्यामागचं नेमकं कारण

pooja sawant

pooja sawant

पुजा सावंत ही आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती अनेक स्टायलिश फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.

  • Published by:  Sayali Zarad
मुंबई, 31 जुलै : अभिनेत्री पुजा सावंतनं (Pooja Sawant) आपल्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. पुजानं एकापेक्षा एक जबरदस्त सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. पुजा ही आपल्या चाहत्यांसोबत कनेक्ट राहण्यासाठी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती अनेक स्टायलिश फोटो, व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. आता पुजा पुन्हा तिच्या नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पुजा सावंतनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिनं लंडनमधला एक फोटो शेअर केलेला पहायला मिळत आहे. या फोटोच्या कॅप्शननं सध्या अनेकांचं लक्ष वेधलंय. पुजानं फोटो शेअर करत लिहिलं की, 'तुम्हाला अस्वस्थ वाटतं कारण तुम्हाला माहितीये तुम्ही यापेक्षा मोठ्या गोष्टींसाठी बनले आहात'. तिच्या या पोस्टवर सध्या अनेक प्रतिक्रिया येत आहे. हेही  वाचा -  Johnny Depp:अभिनेता-गायकच नव्हे तर उत्कृष्ट आर्टिस्टसुद्धा आहे जॉनी डेप; तब्बल इतक्या कोटींना केली पेंटिंग्सची विक्री दरम्यान, बॉलीवूड असो किंवा मराठी सिनेमा पुजाने तिच्या अनोख्या शैलीनं एक छाप सोडली आहे. अशातच पुजा तिच्या आगामी चित्रपटाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पुजा सावंत लवकरच अभिनेता सिद्धार्थ चांदेकरसोबत दिसणार आहे. पूजा आणि सिद्धार्थच्या या आगामी चित्रपटाचं नाव 'काँग्रॅच्युलेशन्स' असं आहे. यामध्ये ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलदेखील दिसणार आहेत. प्रसिद्ध मराठमोळे दिग्दर्शक लोकेश विजय गुप्ते यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे.
पुजा अलीकडेच बळी सिनेमात दिसली होती. तर आगामी दगडी चाळ 2 मधून ती प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यामुळे तिच्या आगामी प्रोजेक्टसाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत.
First published:

Tags: Instagram post, Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment, Social media

पुढील बातम्या