मुंबई, 23 मार्च- ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजप खासदार किरण खेर यांना कोरोनाची लागण झाल्याची घटना ताजी असताना आता एका मराठी अभिनेत्रीची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. तिनं सोशल मीडियावरून सर्वांना मास्क घालण्याचं आवाहन केलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसत आहे. अशातच अभिनेत्रीच्या पोस्टनं चाहत्यांचे लक्षवेधलं आहे. चाहत्यांना अभिनेत्रीची चिंता सतावू लागली आहे.
मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. पूजा सोशल मीडियावर तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करत असते. नुकतीच पूजानं एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. त्यामध्ये पूजा औषध खाताना दिसत आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये तिची आई तिला काढा देताना दिसत आहे.
पूजानं तिच्या या इन्स्टा स्टोरीमध्ये म्हटलं देखील आहे की, दोन दिवसापासून ताप आणि वायरल इन्फेक्शन झालंय. सर्वांनी काळजी घ्या आणि मास्क लावण्याचं आवाहन देखील तिनं या पोस्टमध्ये केलं आहे. पूजा सध्या घरी आराम करत आहे. पूजाची ही पोस्ट पाहून चाहत्यांना तिची काळजी वाटू लागली आहे.
वाचा-शाहरूख खानकडून 'या' गोष्टी आहेत शिकण्यासारख्या, कधी झाला ट्रोल तर..
बालपणापासूनच नृत्याची आवड असणाऱ्या पूजाने डान्स शोमधून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. हळूहळू ती नाटक, मालिका आणि चित्रपटांकडे वळली. तिच्या या प्रवासात तिने अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अभिनेत्री पूजा सावंत हिचा जन्म 25 जानेवारी 1990 ला झाला. पूजाला अभिनयाचं बाळकडू तिच्या घरातूनच मिळालं आहे. पूजाचे वडील विलास सावंत यांनी वयाची देखील अभिनय क्षेत्रात काम केले आहे. पूजाच्या वडिलांनी अनेक दमदार मराठी नाटकांमधून काम केले आहे. वडिलांकडूनच आपल्याला अभिनयाचा वारसा मिळाला, असे पूजा नेहमी सांगते.
शाळेत असल्यापासूनच पूजाला नृत्याची खूप आवड होती. शाळेत पार पडणाऱ्या प्रत्येक डान्स कार्यक्रमात ती आवर्जून भाग घ्यायची. शालेय जीवनात तिने अनेक नाटकं आणि डान्स कार्यक्रमात भाग घेत बक्षीसं पटकावली होती. दरम्यान तिने एका डान्स शोमध्ये देखील भाग घेतला होता. इथून तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.
शाळेत असल्यापासूनच पूजाला नृत्याची खूप आवड होती. शाळेत पार पडणाऱ्या प्रत्येक डान्स कार्यक्रमात ती आवर्जून भाग घ्यायची. शालेय जीवनात तिने अनेक नाटकं आणि डान्स कार्यक्रमात भाग घेत बक्षीसं पटकावली होती. दरम्यान तिने एका डान्स शोमध्ये देखील भाग घेतला होता. इथून तिच्या करिअरची सुरुवात झाली होती.
यानंतर पूजाने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘झकास’, ‘सतरंगी रे’, ‘सांगतो ऐका’, ‘नीलकंठ मास्तर’, ‘पोस्टर बॉईज’, ‘दगडी चाळ’, ‘लपाछपी’ असे अनेक दमदार चित्रपट तिने केले आहेत. मराठीत आपल्या अभिनयाचा जलवा दाखवल्यानंतर आता पूजा बॉलिवूडमध्ये देखील सक्रिय झाली आहे. ‘जंगली’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये देखील पदार्पण केले आहे. या चित्रपटात ती अभिनेता विद्युत जामवालसोबत मुख्य भूमिकेत झळकली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.