पूजाने हे रिल शेअर करत इन्स्टावर म्हटलं आहे की, आशिष पाटील मी तुझ्याकडून प्रेरणा घेऊन हे रिल शेअर करत आहे. तू नेहमी माझ्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवलास आणि म्हणूनच तू पोस्ट केलेले एक सुंदर रिल फक्त कॉपी करण्याचा प्रयत्न केला आहे. मी माझे सर्वोत्तम प्रयत्न केले असले तरी तुझ्यासारखे हवभाव मी करू शकत नाही, असं देखील पूजाने या पोस्टमध्ये म्हटलं आहे. हे वाचा - Bigg Boss 15: आज ग्रँड प्रीमियरमध्ये सलमान खान स्पर्धकांसोबत लावणार मनोरंजनाचा तडका; वाचा शोच्या सर्व डिटेल्स पूजाच्या या रीलवर चाहत्यांनी देखील कमेंट करत तिच्यावरचे प्रेम व्यक्त केले आहे. एका चाहत्याने ए.. कलरफुल.. तर एका नेटकऱ्याने छान...बस इतकं की फिदा..झालो तुझा मी दिवाना झाले अशी कमेंट केली आहे. तर तिसऱ्या नेटकऱ्याने Killed it ..किलड इट अशी कमेंट केली आहे. तिचा कलरफुल साडीतला हा जबरदस्त रील व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.View this post on Instagram
पूजा एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण यासोबत तिला एक उत्तम डान्सर म्हणून देखील ओळखलं जातं. पूजाला लहानपणापासूनच नृत्याची भयंकर आवड असल्याने शाळेत आणि महाविद्यालयात असताना तिने अनेक नृत्यस्पर्धा आणि नाटकांमधून आपल्या अभिनयाची चुणुक दाखवली आणि अनेक बक्षीसं मिळवली आहेत.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.