Home /News /entertainment /

'सामने ये कौन आया दिल में हुई हलचल...' निवेदिता आणि अशोक सराफ यांचा रोमॅंटिक Video पाहिला का?

'सामने ये कौन आया दिल में हुई हलचल...' निवेदिता आणि अशोक सराफ यांचा रोमॅंटिक Video पाहिला का?

निवेदिता सराफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा जुन्या आठवणींना उजाळा देत एक खास आणि तितकाच रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे.

  मुंबई, 24 मे- अभिनेत्री निवेदिता सराफ (nivedita saraf )आणि अशोक सराफ (ashok saraf) मराठी विश्वातील लोकप्रिय जोडी आहे. मराठी विश्वातील एक आदर्श जोडी म्हणून यांच्याकडे पाहिले जाते. निवेदिता सराफ सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. त्यांनी अशोक सराफ यांच्यासोबतचा जुन्या आठवणींना उजाळा देत एक खास आणि तितकाच रोमॅंटिक व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या या दोघांचा हा रोमॅंटिक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. निवेदिता यांनी अशोक सराफ यांच्यासोबत फेका फेकी या सिनेमातील एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. शिवाय या व्हिडिओच्या मागे सामने ये कौन आया दिल में हुई हलचल...हे रोमॅंटिक गाणं देखील वाजत आहे. मराठीतील लव्हली कपल आणि त्यात हे रोमॅंटिक गाणं चाहत्यांना देखील जुन्या आठवणीत घेऊन जात आहे. चाहत्यांना तर हा व्हि़डिओ आवडल्याचे कमेंट बॉक्सवरून कळते. या जोडीवर कमेंटमधूम चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. अभिनेत्री निवेदिता सराफ (nivedita saraf )आणि अशोक सराफ (ashok saraf) यांच्या व्हिडिओवर कमेंट करत एका चाहत्याने म्हटलं आहे की, खूप सुंदर जोडी आहे तुमची ❤️❤️ तर दुसऱ्याने म्हटलं आहे की, एक नंबर जोडी आहे. तर एकानं म्हटलं आहे की, लव्हस्टोरी ..खरी लव्हस्टोरी...प्रत्येकाने माझी आवडती जोडी..म्हणत या दोघांचे कौतुक केलं आहे. आजही या जोडीचा प्रचंड चाहता वर्ग असल्याचे दिसते.
  अशोक सराफ आणि निवेदिता सराफ लव्हस्टोरी प्रेमाला वयाचे बंधन नसते असे म्हणतात. अगदी हीच गोष्ट निवेदित सराफ यांनी अशोक सराफ यांच्या बाबतीत खरी ठरती. ह्या दोन्ही जोडप्यात तब्बल 18 वर्षांचा फरक आहे. दोघांची ‘डार्लिंग डार्लिंग’ ह्या नाटकावेळी पहिली भेट झाली होती. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ ह्या चित्रपटांत अशोक सराफ आणि निवेदिता जोशी हे दोघेही कलाकार होते. त्या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान त्यांचे एकमेकांशी कधीच बोलणे झाले नाही. हा चित्रपट लोकांना खूप आवडला. आणि ह्या चित्रपटापासूनच ह्या दोघांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली. वाचा-अंजिक्य राऊतचं इन्स्टावर जोरात कमबॅक, असं परत मिळवलं हॅक झालेलं अंकाऊट ‘धुमधडाका’ चित्रपटावेळी दोघेही एकमेकांशी बोलू लागले. त्यानंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. आणि काही काळानंतर ह्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर घरातील नातेवाईक, खास मित्रमंडळी आणि काही मोजकेच लोकं ह्यांच्या उपस्थित दोघांचाही विवाह गोव्यातील मंगेशी देवीच्या मंदिरात घरगुती पद्धतीने झाला.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment

  पुढील बातम्या