मुंबई, 9 जून- मराठीतील प्रसिध्द (Marathi Actress) अभिनेत्री मुक्ता बर्वे (Mukta Barve) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार आहे. ‘अजूनही बरसात आहे’ (Ajunahi Barsat Ahe) या मालिकेतून ती चाहत्यांच्या भेटीला येत आहे. मुक्ता सोबतचं अभिनेता उमेश कामत (Umesh Kamat) यामध्ये दिसणार आहे. एखाद नातं संपल तरी प्रेम संपत नाही असं म्हटलं जात. याच ओळीला साजेशी अशी या मालिकेची कथा असणार आहे.
View this post on Instagram
नुकताच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. यामध्ये मीरा म्हणजेच मुक्ता आणि आदी म्हणजेच उमेश कामत एका वधू वर सूचक मंडळात आलेले असतात. आणि अचानक त्यांची भेट होते. आणि त्यांच्या बोलण्यावरून हे कळत की हे दोघे आधीपासूनचं एकमेकांच्या प्रेमात होते. मात्र सध्या त्यांचं ब्रेकअप झालेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या मनात एकमेकांबद्दल अजूनही काही फिलिंग्स आहेत. तर एकंदरीतचं ब्रेकअप झालेल्या एका जोडप्याची ही कथा असणार आहे जी काही वर्षांनी पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले आहेत. आत्ता त्यांच्यामध्ये पुन्हा प्रेमाची कळी खुलणार का हे पाहणं खुपचं औस्तुक्याचं असणार आहे.
(हे वाचा: ओम-स्विटूच्या रोमान्सनं वातावरण झालं गुलाबी; मालविका होऊ देणार का दोघांचं लग्न? )
सोनी मराठीवर ही मालिका सर्वांच्या भेटीला येणार आहे. 12 जुलैपासून ही मालिका प्रसारित केली जाणार आहे. ‘अजूनही बरसात आहे’ असं या मालिकेचं नाव आहे. उमेश कामत आणि मुक्ता बर्वे ही जोडी यामध्ये झळकणार आहे. हे दोघेही मराठीतील एक उत्तम कलाकार आहेत. दोघांनीही आपल्या अभिनयाने आपला एक खास चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे त्यांना छोट्या पडद्यावर परतताना बघून चाहते जाम खुश आहेत. त्यामुळे या दोघांनाही चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल यात काही शंका नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment