• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • ​माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्रीला मंदिर प्रवेश नाकारला ; Video पोस्ट करत सांगितलं कारण

​माझा होशील ना मालिकेतील अभिनेत्रीला मंदिर प्रवेश नाकारला ; Video पोस्ट करत सांगितलं कारण

. मुग्धाला नुकताच मंदिर प्रवेश नाकारला. तिच्यासोबत हा घडलेला प्रकार तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे.

 • Share this:
  मुंबई, 9 नोव्हेंबर- झी म​​राठी वाहिनीवर ​​माझा होशील ना या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र प्रेक्षकांचे आवडते होते. आजही प्रेक्षक त्यांना विसरू शकलेले नाहीत. या मालिकेत सईची मैत्रीण नयना म्हणजे मुग्धा पुराणिक (marathi actress mugdha puranik ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. मुग्धाला नुकताच मंदिर प्रवेश नाकारला. तिच्यासोबत हा घडलेला प्रकार तिनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. मुग्धाने या सगळ्या घडलेल्या प्रकाराची माहिती देणारा तिचा एक व्हिडीओ इन्स्टावर शेअर केला आहे. मुग्धा तिच्या मैत्रिणीसोबत 7 नोव्हेंबर, रविवारी कल्याण येथील प्रसिद्ध मानस मंदिर जैन ​मंदिर येथे देवदर्शनासाठी गेली होती. परंतु आत रांगेत उभे असताना त्यांना तिथल्या समाजातील लोकांनी ​हटकलं आणि तुम्ही मंदिरात जाऊ शकत नाही असं सांगितलं. याबाबत कारण विचारलं तर त्या लोकांनी तुम्ही जैन धर्मीय नाहीत असं सांगितलं. त्यामुळे मंदिरात तुम्हाला प्रवेश करता येणार नाही असं त्यांनी बजावून सांगितलं.
  मंदिरात प्रवेश नाकारल्याने अभिनेत्री मुग्धा पुराणिक हिने एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओत तिने आपल्याला आलेला अनुभव सांगितला असून याबाबत योग्य ती कारवाई करण्यात यावी असेही मत मांडले आहे. हिंदू धर्मियांच्या मंदिरात सर्वांना प्रवेश दिला जातो. मी स्वतः जात​, ​धर्म ह्या गोष्टीमध्ये भेद करत नाही. त्यामुळे मी काल जैन मंदिरात दर्शनासाठी गेले होते. मात्र आम्हाला त्याठिकाणी केवळ जैन धर्मीय नसल्याने प्रवेश नाकारण्यात आला​. आपल्या हिंदू​ मंदिरात सर्वांना विनामूल्य कुठलेही पैसे न घेता दर्शन दिले जाते. मात्र कालचा अनुभव माझ्यासाठी खूपच वाईट होता. मंदिरात गेल्यावर सुरुवातीला​ आम्हाला ओढणी देण्यात आली ती आम्ही घेऊन रांगेत उभे राहिलो होतो पण जैन धर्मीय नसल्याने आम्हाला दर्शन घेण्यास मनाई केली गेली. त्यामुळे साहजिकच मुग्धाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. वाचा : 'तारक मेहता का उल्टा चश्मा' फेम 'बबीता'ने खरेदी केलं स्वत:चं घर; Inside Photos माझा हा व्हिडीओ पाहून कोणीतरी आवाज उठवावा अशी अपेक्षा तिने सोशल मीडियावर व्यक्त केली आहे. तिच्या या मताला अनेकांनी पाठिंबा दर्शवला आहे. वाचा :पूनम पांडेला पतीकडून बेदम मारहाण, भिंतीवर आपटलं डोकं, सॅम बॉम्बेला अटक मुग्धा पुराणिक अभिनयासोबतच एक अप्रतिम गायिका देखील आहे. ती नेहमीच तिच्या गाण्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करीत असते. तिने विविध नाटके आणि संगीतातही सहभाग घेतला आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: