Home /News /entertainment /

अभिनेत्री मुंबईसोडून महाराष्ट्रातील या ठिकाणी पतीसोबत करतेय शेती ; फोटो शेअर करत दिली माहिती

अभिनेत्री मुंबईसोडून महाराष्ट्रातील या ठिकाणी पतीसोबत करतेय शेती ; फोटो शेअर करत दिली माहिती

मृण्मयी देशपांडे मुंबईपासून दूर एका थंड (mahabaleshwar) हवेच्या ठिकाणी नवऱ्यासोबत सुट्टयांचा सोबत शेती (farm life) करण्याचा देखील आनंद घेत आहे.

  मुंबई, 16 जानेवारी- अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ( mrinmayee deshpande) हिने विविध भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. सध्या मृण्मयी मुंबईपासून दूर एका थंड (mahabaleshwar) हवेच्या ठिकाणी नवऱ्यासोबत सुट्टयांचा सोबत शेती (farm life) करण्याचा देखील आनंद घेत आहे. सोशल मीडियावर तिनं काही फोटो पोस्ट करत तिनं याबद्दल माहिती दिली आहे. दोघेही शेती करण्याचा आनंद घेत आहेत. सध्या सगळी थंडी पडली आहे. मागच्या तीन चार दिवसात तर थंडीनं कहर केला आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ही देखील थंडीचा सोबत शेती, निर्सग याचा आनंद घेण्यासाठी महाबळेश्वरला आली आहे. तिनं एक व्हिडिओ शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. शिवाय तिनं शेतीचे काही फोटो तिच्या इन्स्टा स्टोरीला देखील ठेवले आहेत. यामध्ये तिचा नवरा देखील दिसत आहे. मस्त हिरवेगार शेत आणि आजू बाजूला देखील हिरवागार परिसर मनाला प्रसन्न करत आहे. तिनं एक फोटो शेअर करत म्हटलं आहे की, बॅक टू फार्म लाईफ...मुंबईसोडून ती सध्या महाबळेश्वरमधील शेतीचा तिथल्या निर्सगरम्य वातावरणाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री मृण्मयी देशपांडे आणि तिचा पती स्वप्नील राव ही जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील अनुरूप जोडी समजली जाते. या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडते मृण्मयी आणि स्वप्निल सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात. या दोघांना फिरण्याची आवड आहे. त्यांचे सोशल मीडियावरचे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते.
  विशेष म्हणजे दोघेही अनेकदा व्हिलेज लाईफ असेल किंवा निर्सगरम्य ठिकाणी फिरताना दिसतात. या दोघांनी 3 डिसेंबर 2016 रोजी लग्नगाठ बांधली.मृण्मयी-स्वप्नीलचे लग्न हे अरेंज मॅरेज झाले आहे. मृण्मयी देशपांडे पुण्याची तर स्वप्नील राव मुंबईचा आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment

  पुढील बातम्या