Home /News /entertainment /

मानसिक तयारी नी ये..​ मुलाच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांचं जबाबदारीचं जाणीव करणार पत्र चर्चेत

मानसिक तयारी नी ये..​ मुलाच्या वाढदिवशी मृणाल कुलकर्णी यांचं जबाबदारीचं जाणीव करणार पत्र चर्चेत

माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी (virajas kulkarni birthday) याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याची आई अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी ( mrinal kulkarni) यांनी त्याच्यासाठी खास पत्र लिहिले आहे.

    मुंबई, 28 फेब्रुवारी- माझा होशील ना फेम विराजस कुलकर्णी  (virajas kulkarni birthday) याचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त त्याची आई अभिनेत्री मृणाल देव कुलकर्णी ( mrinal kulkarni)   यांनी त्याच्यासाठी खास पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा तर दिल्याच आहेत पण त्याच्या आगामी प्रोजेक्टचा उलगडा देखील केला आहे. यासोबतच त्याच्या जबाबदारीची जाणीव देखील त्यांनी करून दिली आहे. मृणाल देव कुलकर्णी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, प्रिय विराजस ,अनेक वर्ष आपण ( म्हणजे आम्ही दोघे जास्त ! )तुझ्या या वाढदिवसाची वाट पहात होतो ..कारण काहीही ठरवायचं असलं तरी २०२२ फेब्रुवारी नंतर असं च तुझं उत्तर असायचं .. बरं झालं या तारखेआधीच तू काही गोष्टी ठरवून टाकल्यास (विशेषतः लग्न ) काही महत्त्वाच्या पूर्ण करतो आहेस ( नवीन नाटक ) आणि काही सुरू केल्या आहेस .. ( तुझा पहिला चित्रपट ) आता या वाढदिवसा पासून च्या वर्षात अनेक वेगळ्या गोष्टी घडतील .. आयुष्यात अनेक सुंदर बदल होतील ..लग्न होईल , जबाबदारीही वाढेल ..आम्हाला खात्री आहे की या नव्या पर्वात ही तू नेहेमीच्या आत्मविश्वास आणि तळमळीने काम करशील. वाचा-'सुख म्हणजे..' फेम गौरीच्या लुकमध्ये होणार बदल, लवकरच येणार नवा ट्विस्ट? मेहेनती आणि समजूतदार तर तू आहेसच त्यामुळे आम्हाला तुझे कौतुक आहे आणि खात्रीही ! छान रहा ..काळजी घे ! तुझ्या आयुष्यातल्या या महत्वपूर्ण वर्षा साठी तुला खूप शुभेच्छा आणि प्रेम ..-आई बाबा. त्याला शुभेच्छा देत पोस्टच्या शेवटी ताजा कलममध्ये मृणाल यांनी त्याची खोली आवरून ठेवल्याचा निरोप देत म्हटलं आहे की, तू नसताना तुझी खोली लख्ख आवरण्याची संधी मी आजही सोडलेली नाही .. मानसिक तयारी नी ये !! काही दिवसांपूर्वीच विराजस कुलकर्णीने अभिनेत्री शिवानी रांगोळेसोबत साखरपुडा केला आहे. सोशल मीडियावरून या दोघांनी ही बातमी दिली होती. यासोबतच काही फोटो देखील शेअर केले होतो. आता ही क्यूट जोडी लग्नबंधनात कधी अडकणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. शिवाय आज सोशल मीडियावर विराजसवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या