...म्हणून अभिनेत्रीने मानले मैत्रिणीचे आभार; पतीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच शेअर केला VIDEO

...म्हणून अभिनेत्रीने मानले मैत्रिणीचे आभार; पतीच्या आत्महत्येनंतर पहिल्यांदाच शेअर केला VIDEO

पतीच्या निधनानंतर अभिनेत्री मयुरी देशमुखने (Mayuri Deshmukh) पहिल्यांदाच एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. यात तिने आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणीचे आभार मानले आहेत.

  • Share this:

मुंबई, 15 ऑक्टोबर: 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतील अभिनेत्री मयुरी देशमुख (Mayuri Deshmukh)च्या पतीने काही दिवसांपूर्वी राहत्या घरातच आत्महत्या केली होती. आशुतोष भाकरेने नैराश्यामध्ये जाऊन आपलं जीवन संपवलं असल्याची माहिती पुढे आली होती. आशुतोषच्या मृत्यूमुळे मयुरी आणि तिच्या कुटुबियांना मोठा धक्का बसला होता. हळुहळु मयुरी आपल्या दु:खातून सावरत आहे. नुकताच तिने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधून तिने आपल्या सर्वात जवळच्या मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच आशुतोषच्या भावना समजून घेण्याबद्दल तिचे आभारही मानले आहेत.

मयुरीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती म्हणाली आहे, "श्वेता माझ्याकडून आणि आशुतोषकडून तुला वाढदिवसाच्या मानपासून शुभेच्छा. आशुतोषला स्वत:च्या भावना शब्दातून व्यक्त करता येत नव्हत्या. पण तू त्याला त्याच्या पद्धतीने समजून घेतलंस. माझी मैत्रिण असूनही तू आशुतोषला खूप मदत केलीस. नैराश्य दूर करण्याच्या प्रयत्नात तू कायम आमच्यासोबत होतीस. तुझ्यासारख्या लोकांची आज जगाला खूप गरज आहे. तू जे काही केलंस त्यासाठी तूझे आभार."

View this post on Instagram

A post shared by Mayuri :) (@mayurideshmukhofficialll) on

मयुरीचा पती आशुतोष भाकरेने 'इचार ठरला पक्का' आणि 'भाकर' या चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष आणि मयुरीचं लग्न झालं होतं. लॉकडाऊनमध्ये नांदेडच्या घरी असताना आशुतोषने आत्महत्या केली. अभिनेत्री मयुरी देशमुख हिने अनेक सीरिअल्स, सिनेमा आणि नाटकांमध्ये कामं केली आहेत. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेने तिला ओळख मिळवून दिली. '31 दिवस' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या सिनेमांमध्येही मयुरी झळकली होती. 'डिअर आजो', 'तिसरे बादशाह हम' या नाटकांमध्येही तिने काम केलं आहे.

Published by: Amruta Abhyankar
First published: October 15, 2020, 3:25 PM IST

ताज्या बातम्या