मुंबई, 25 मार्च- ‘खुलता कळी खुलेना’ फेम अभिनेत्री मयुरी देशमुखच्या पतीने आत्महत्या करत जीवन संपवलं. पती आशुतोषच्या जाण्याच्या धक्क्यातून अभिनेत्री मयुरी देशमुख स्वतः सावरण्याचा प्रयत्न करत पुन्हा जोमानं उभं राहण्याचा प्रयत्न करतेय. आशुतोषच्या या पाऊलामुळे त्याच्या घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. नुकतीच मयुरीनं एक सोशल मीडिया पोस्ट केली आहे. सध्या तिची पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे.
मयुरी देशमुखनं नुकतंच इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यामध्ये मयूरी म्हणते की, 'कोणाच्याही मदतीशिवाय स्वत:ला सावरणाऱ्या महिलेपेक्षा भीषण काहीही असू शकत नाही. एखाद्याने तिला घाणीत जरी धकलले तरी ती त्या घाणीतूनही वर येऊन उभी राहते. त्यामुळे कोणत्याही वाईट गोष्टी तिला घाबरवू शकत नाहीत. ती तुमच्या अपमानाशीही कायमच जुळवून घेते. त्यामुळे सावध राहा,' अशा शब्दात मयूरीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मयूरीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत तिला पाठींबा दिला आहे. तर काहींनी तीचं कौतुक करत तिला धीर देण्याचा प्रयत्न दिला. मयुरी देशमुखने या सगळ्या परस्थितीनं ज्या पद्धतीने स्वतःला आणि कुटुंबाला सावरलं आहे त्यासाठी तीचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
वाचा-बॉलिवूड सिनेमांची कथा मालिकांनी केल्या कॉपी; कोणी ठरल TRPत अव्वल, तर कोणी फ्लॉप
मयुरी देशमुख हिचा 20 जानेवारी 2016 रोजी आशुतोष भाकरेशी लग्न झालं होतं. आशुतोषने ‘इच्यार ठरला पक्का’ आणि ‘भाकर’ या दोन चित्रपटांमध्ये काम केलं होतं. लॉकडाऊनमध्ये नांदेडच्या घरी असताना आशुतोषने आत्महत्या केली.अभिनेत्री मयुरी देशमुखने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. 'खुलता कळी खुलेना' या मालिकेतून ती घराघरात पोहचली. '३१ दिवस' आणि 'डॉ. प्रकाश बाबा आमटे' या चित्रपटात मयुरीने काम केले आहे.
View this post on Instagram
मयुरी व आशुतोष लव्हस्टोरी
मयुरी व आशुतोषचे म्हणायला एक अरेंज मॅरेज आणि मानायची तर एक लव्हस्टोरी होती. तर या लव्हस्टोरीची सुरुवात झाली होती एका पार्टीत.तर मयुरीचे पप्पा निवृत्त झाले. त्यावेळी त्यांनी एक पार्टी दिली. मयुरीच्या मानलेल्या भावांना त्यावेळी एक मुलगा खूप आवडला होता आणि तो मयुरीसाठी योग्य असल्याचे जाणवल्याने त्यांनी तिच्या न कळत त्यालाही पार्टीला बोलावले होते. तो, त्याचे वडील, मामा पार्टीला आले होते. कोणीतरी आपल्याला बघायला येतेय, याची मयुरीला काहीच कल्पना नव्हती. ती नेहमीप्रमाणेच तिच्याच विचारात होती. या पार्टीत तिने त्याला अगदी ओझरते पाहिले आणि सहज हाय, हॅलो केले. पुढे तर ही भेट ती विसरूनही गेली होती. असा एक मुलगा कोणी पार्टीला आला होता, हे तिच्या लक्षातही नव्हते. मग दोन दिवसांनी घराच्यांनी तिला विचारलेच. पार्टीला आलेला तो मुलगा तुला कसा वाटला, असा थेट प्रश्नच त्यांनी तिला केला. मयुरीसाठी हा धक्काच होता. मग घरच्यांनी तिला त्याची सगळी माहिती सांगितली. पण मयुरीने लग्नाला थेट नकार दिला होता. मात्र घरच्यांनी मुलाकडच्यांना तिचा नकार कळवलाच नाही.
आशुतोष तर पहिल्या भेटीतच मयुरीच्या प्रेमात पडला होता. तिने काहीतरी उत्तर द्यावे होकार किंवा नकार कळवावा, असेच त्याला वाटत होते. पण मयुरीकडून काहीच प्रतिसाद नव्हता.त्यानंतर पुन्हा एकदा योग आला. निदान एकदा तरी त्या मुलाला भेट नंतर वाटले तर तू त्याला नकार दे,असे घरच्यांनी तिला सांगितला. ती सुद्धा तयार झाली. एका तासात भेटून परत यायचे असेच ठरवून मयुरी आशुतोषला भेटायला गेली. पहिल्याच भेटीत आशुतोषने लग्नाच्या निर्णयाचा बॉल मयुरीच्या कोर्टात टाकला. पुढे मयुरीनेही आशुतोषला लग्नासाठी होकार कळवला आणि पहिल्या भेटीच्या सात-आठ महिन्यांनंतर दोघांनीही लग्न केले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.