• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • मानसी नाईक आणि तिच्या नवऱ्याची कशाने झाली अशी अवस्था, Video होतोय व्हायरल

मानसी नाईक आणि तिच्या नवऱ्याची कशाने झाली अशी अवस्था, Video होतोय व्हायरल

मानसी आणि तिचा नवरा प्रदीप खरेराचा (mansi naik and pradip kharera ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील या दोघांची विचित्र अवस्था पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे नेमकी कशामुळे ही अवस्था आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 09 ऑक्टोबर: बघतोय रिक्षावाला फेम अभिनेत्री मानसी नाईक (mansi naik ) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. नवरा प्रदीप खरेरा याच्यासोबतचे काही फोटो व व्हिडिओ देखील ती सोशल मीडियावर शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने बेबी बंपसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र नंतर समजले की एका शॉर्ट व्हिडिओसाठी तिने हा गेटअप केला होता. आता मानसी आणि तिचा नवरा प्रदीप खरेराचा (mansi naik and pradip kharera ) एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमधील या दोघांची (mansi naik latest video )विचित्र अवस्था पाहून चाहत्यांना प्रश्न पडला आहे नेमकी कशामुळे त्यांची अशी अवस्था आली आहे. यामुळे त्यांचा चाहता वर्ग चिंतेत आहे. मानसी नाईकने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मानसी आणि तिचा नवरा प्रदीप खरेरा विचित्र अवस्थेत दिसत आहेत. मानसीच्या गालावर गुलाबी डॉट व प्रदीपच्या चेहऱ्याचा झालेला अवतार पाहून चाहता वर्ग चिंतेत आहे. मात्र यानंतर हे दोघे लगेच एक ग्लॅमरस फोटोशुट करताना दिसत आहेत. वाचा : Aryan Khan प्रकरणात चर्चेत आलेली शाहरुख खानची मॅनेजर आहे तरी कोण? 45 कोटींची आहे मालकीण मानसीने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, केसा लगा?.दुसऱ्या लूकमध्ये मानसी आणि प्रदीप खूपच ग्लॅमरस दिसत आहेत. काळा रंगाच्या कपड्यात ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना त्यांचा हा हटके अंदाज खूपच भावलेला आहे. त्यांच्या या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. सोशल मीडियावर त्यांचा हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
  मानसीने ‘एकता-एक पॉवर’, ‘कुटुंब’, ‘तीन बायका फजिती ऐका’, ‘जबरदस्त’, ‘मर्डर मेस्त्री’, ‘ढोलकी’, ‘हू तू तू’, ‘कोकणस्थ’ या चित्रपटाद्वारे आपले अभिनय कौशल्य दाखवले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती चांगली नृत्यांगनासुद्धा आहे. ‘बघतोय रिक्षावाला’ या गाण्याच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांना चागलंच याड लावले. ‘ढोलकीच्या तालावर’, ‘हॅलो बोल’, ‘मराठी तारका’ यासारख्या अनेक मराठी रियालिटी डान्सिंग शोच्या माध्यमातूनही मानसी प्रेक्षकांच्या भेटीला आली. वाचा : बानूच्य नजरेचा बाणा अन् चाहत्यांच्या काळजावर घाला, पाहा VIDEO मानसी नाईकने काही दिवसांपूर्वी बॉक्सर प्रदीप खरेरा याच्यासोबत विवाहबंधनात अडकली आहे. दोघेही सोशल मीडियावर विविध फोटो तसेच व्हिडिओ शेअर करत असतात. दोघांचाही सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.
  Published by:News18 Trending Desk
  First published: