मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

मानसी नाईकच्या Karwa Chauth स्पेशल फोटोवर 'या' व्यक्तीची खास कमेंट

मानसी नाईकच्या Karwa Chauth स्पेशल फोटोवर 'या' व्यक्तीची खास कमेंट

मानसी नाईकचे यंदा पहिलं (manasi naik first karwa chauth) करवा चौथ ( Karwa Chauth Vrat) आहे. मानसीने या निमित्त सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मानसी नाईकचे यंदा पहिलं (manasi naik first karwa chauth) करवा चौथ ( Karwa Chauth Vrat) आहे. मानसीने या निमित्त सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

मानसी नाईकचे यंदा पहिलं (manasi naik first karwa chauth) करवा चौथ ( Karwa Chauth Vrat) आहे. मानसीने या निमित्त सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 24 ऑक्टोबर : मराठमोळी अभिनेत्री मानसी नाईक(manasi naik) मराठी चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. मानसी सोशल मीडियावर नेहमी ॲक्टीव असते. तिचे विविध फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. काही महिन्यांपूर्वी ती प्रदीप खरेरासोबत लग्नबंधनात अडकली. मानसीचे यंदा पहिलं (manasi naik first karwa chauth) करवा चौथ ( Karwa Chauth Vrat) आहे. मानसीने या निमित्त सोशल मीडियावर तिचे सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या या या फोटोवर चाहत्यांकडून कमेंटच्या वर्षाव होत आहे.

मानसी नाईकने अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून तिचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिने मस्त असा साजश्रृंगार केला आहे. खास करावा हे फोटो तिने खास करवा चौथनिमित्त शेअर केले आहेत. तिने लाल रंगाची अत्यंत सुंदर अशी भरजरी काठाची साडी नेसली आहे. यावर तिने गळ्यात मंगळसूत्र व एक लाल रंगाचा हार घातला आहे. यासोबतच तिन लाल रंगाचे कानातले घातले आहे. सोबतच कपाळी लाल रंगाची टिकली देखील लावले आहे. तिला हा साजश्रृंगार खूप शोभून दिसत आहेत. ती हातात सरगी म्हणजे चाळणी घेऊन पोज देत आहे. तसेंच तिच्या हातातला लाल रंगाचा चुडा देखील लक्षवेधून घेत आहे. यासोबतच हातावर सुंदर मेहंदी देखील काढलेली आहे.

वाचा : 'या' तरुण नेत्याला पाहायचं पंतप्रधानपदी; दीपिका पादुकोनची इच्छा होणार का पूर्ण?

मानसीने हे फोटो शेअर करत म्हटले आहे की, व्रत रखा है मैंने बस एक प्यारी सी ख्वाहिश के साथ,हो लम्बी उम्र तुम्हारीऔर हर जन्म मिले हमें एक दूसरे का साथ।करवा चौथ की हार्दिक बधाई🌚🙏🏻@pardeepkharera1 ❤️तिचा हा फोटो चाहत्यांना देखील खूप आवडला आहे. चाहत्यांकडून तिच्या या फोटोवर कमेंटचा वर्षाव सुरू आहे. यासोबतच तिची जवळची मैत्रीण अभिनेत्री दीपाली सय्यदने देखील एक कमेंट केली आहे व तिच्या सुंदरतेचे कौतुक केले आहे. किती गोड दिसतेस मनु..अशी कमेंट दीपाली सय्यजने केली आहे.

मानसी नाईकने या वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी महिन्यात तिचा बॉयफ्रेंड प्रदीप खरेरासोबत लग्नगाठ बांधली. त्यांच्या लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. प्रदीप इंटरनॅशनल बॉक्सर आहे तसेच त्याचे यूट्यूब चॅनल देखील आहे. हे दोघे विविध प्रकारचे व्हिडीओ चाहत्यांसोबत यावरून शेअर करत असतात.

वाचा : रिंकू राजगुरूला गुलाबी साडीत पाहून चाहते सैराट, पाहा Photo

मानसी नाईकच्या करिअरबद्दल सांगायचं तर तिने 2007 साली 'जबरदस्त' या मराठी चित्रपटातून अभिनय क्षेत्रात प्रवेश केला. चार दिवस सासूचे या मालिकेत मुख्य भूमिका साकारली होती ती विशेष गाजली आणि मानसी नाईक महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. तसेच वाट बघतोय रिक्षावाला आणि बाई वाड्यावर या गाण्याने तिला विशेष ओळख दिली. यायोबतच मानसीने अनेक डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून देखील काम पाहिले आहे.

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला सुवासिनी महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत ( Karwa Chauth Vrat)करतात. यंदाच्या वर्षी करवा चौथ आज, 24 ऑक्टोबर रोजी साजरा होतोय. अनेक सेलेब्स देखील ही पूजा घऱी आयोजीत करतात. मराठमोली अभिनेत्री सोनाली कुलकर्णीचे देखील यंदा पहिले करवा चौथ आहे. यासाठी ती दुबईला गेली आहे.

First published:

Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment