Home /News /entertainment /

'हा VIDEO माझ्यासाठी खुपचं खास', मानसी नाईकने शेयर केल्या लग्नाच्या आठवणी

'हा VIDEO माझ्यासाठी खुपचं खास', मानसी नाईकने शेयर केल्या लग्नाच्या आठवणी

मराठी अभिनेत्री(Marathi Actress) मानसी नाईक(Manasi Naik) काही महिन्यांपूर्वीचं लग्नबेडीत अडकली आहे.

    मुंबई, 4 जून-  मराठी अभिनेत्री(Marathi Actress) मानसी नाईक(Manasi Naik) काही महिन्यांपूर्वीचं लग्नबेडीत अडकली आहे. ती आपल्या पतीसोबत सतत काही ना काही व्हिडीओ(Video) सोशल मीडियावर शेयर करत असते. आजदेखील मानसीने एक व्हिडीओ शेयर केला आहे. हा व्हिडीओ मानसीच्या लग्नांनंतरचा आहे. त्यामध्ये ती नवऱ्यासोबत रंगपाणी खेळताना दिसत आहे. मानसी नाईक आपल्या पतीसोबत सतत सोशल मीडियावर सक्रीय असते. ती नेहमीच आपल्या खाजगी गोष्टी चाहत्यांशी शेयर करत असते. मानसीने आज आपल्या सोशल मीडियावर एक खास व्हिडीओ शेयर केला आहे. आणि त्याला कॅप्शन देत हा व्हिडीओ माझ्यासाठी खुपचं खास आहे, नक्की पाहा असंसुद्धा म्हटलं आहे. हा व्हिडीओ लग्नांनंतर ज्या चालीरिती केल्या जातात त्याचा आहे. यामध्ये मानसी आणि तिचा पती प्रदीप रंगपाणी खेळताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये अंगठी शोधण्यात प्रदीप प्रत्येकवेळी बाजी मारताना दिसत आहे. सोबतचं त्यांचं कुटुंबसुद्धा मजामस्ती करताना दिसत आहेत. (हे वाचा: सोनममुळे अर्जुन कपूरने खाल्ला होता मार, वाचा या बहीण-भावाचा भन्नाट किस्सा ) मानसी नाईकने जानेवारीमध्ये प्रदीप खरेरासोबत लग्न केल आहे. प्रदीप हा एक प्रोफेशनल बॉक्सर आहे. प्रदीपसुद्धा खुपचं लोकप्रिय आहे. या दोघांचं लग्नसुद्धा मनोरंजन क्षेत्रात चर्चेचा विषय होता. सर्वांनांचं मानसीच्या लग्नाची उत्सुकता लागून होती. अखेर 19 जानेवारीला यांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र यांच्या लग्नामध्ये मोजक्याच लोकांची उपस्थिती होती. (हे वाचा:सुनील शेट्टीची Love Story होती एकदम फिल्मी; प्रेयसीसाठी पाहिली 9 वर्ष वाट ) मानसी आणि प्रदीप एकमेकांना खूपच दिवस डेट करत होते. त्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. लग्नानंतर दोघेही खुपचं आनंदी आहेत. हे दोघेही सतत आपले अनुभव सोशल मीडियावर शेयर करत असतात. एकमेकांवर प्रेमसुद्धा व्यक्त करत असतात. या दोघांनाही सोशल मीडियावर खुपचं पसंत केल जातं.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi entertainment

    पुढील बातम्या